Congress vs BJP Clash  saam tv
देश विदेश

Congress vs BJP Clash : डॉ. आंबेडकर आणि संविधानाच्या मुद्द्यावरून आप,काँग्रेस-भाजप नगरसेवक भिडले; सभागृहातच केली एकमेकांना मारहाण, VIDEO

Congress vs BJP Clash update : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या मुद्द्यावरून आप-भाजप नगरसेवक भिडल्याची घटना घडली आहे. यावेळी सभागृहातच एकमेकांना मारहाण केल्याचं पाहायला मिळालं.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशातील राजकारण तापलं आहे. या मुद्यावरून सुरु झालेल्या वादाला हिंसक वळण लागलं आहे. या मुद्द्यावरून चंदीगड महापालिकेत काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवक भिडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहात मांडला. या प्रस्तावाच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी एकमेकांना मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नगरसेवक एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे.

संपूर्ण वाद हा नगरसेवक अनिल मसीह हे सभागृहात पोहोचल्यानंतर सुरु झाला. ते सभागृहात पोहोचल्यानंतर काँग्रेस आणि आपच्या नगरसेवकांनी नारा दिला.

नगरसेवक अनिल मसीह यांनी मत चोर म्हणत नारा दिला. यामुळे अनिल मसीह यांना राग आला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी म्हटलं की, 'राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासहित काँग्रेसचे अनेक नेत जामीनावर बाहेर आहेत. यानंतर आपचे नगरसेवक आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी पोस्टर झळकवले. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी पोस्टर हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकमेकांना मारहाण केली.

काही नगरसेवक मारहाणीदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरात आढळले. या व्हिडिओत दोन्ही गटाचे नगरसेवक हाणामारी करताना दिसले. यावेळी नगरसेवकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप केला. दुसरीकडे भाजप नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर टीका करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करत निशाणा साधला होता. मात्र, अमित शहा यांच्या त्याच वक्तव्यावरून काँग्रेस खासदारांनी जोरदार विरोध केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT