Rahul Gandhi : दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली; राहुल गांधींचा गंभीर आरोप, सूर्यवंशी कुटुंबीयांची घेतली भेट

Somnath Suyavanshi Death Case : परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आज राहुल गांधी यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन आणि महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली. हा 99 टक्के नव्हे तर 100 टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. आज राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी कुटुंबीय चांगलेच भावूक झालेले बघायला मिळाले.

परभणी येथे 10 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी त्यांना तब्यात घेतलं. यात सोमनाथ सूर्यवंशी देखील होते. यावेळी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या 12 दिवसांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज परभणीत येऊन काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. मी मारहाण झालेल्या लोकांचीही भेट घेतली. मला त्यांनी शवविच्छेदन अहवाल दाखवला, व्हिडिओ व फोटोही दाखवले. सोमनाथ सूर्यवंशी हा दलित होता व तो संविधानाचे संरक्षण करत होता म्हणून त्याला मारण्यात आले आहे, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com