Crime News : संतापजनक! आजारी आईला मुलाने घरात कोंडलं, तहान-भुकेने माऊलीने सोडला जीव, हत्येचा गुन्हा दाखल

Bhopal Crime News : ८० वर्षीय आजारी वृद्ध आईला घरातच कोंडून मुलगा आणि सून उज्जैनला निघून गेले. दोन दिवसानंतर वृद्ध महिला मृत अवस्थेत सापडली. याप्रकरणी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वृद्ध
वृद्ध Saam TV
Published On

Bhopal Crime News : भोपाळमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वृद्ध आणि आजारी असणाऱ्या आईला घरात बंद करून मुलगा आणि सून दुसऱ्या शहरात निघून गेले. तहान भुकेने व्याकूळ झालेल्या त्या आजींचा तडफडून मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा मानसिक रोगी असल्याचे समजतेय. त्याचे नाव अरूण आहे.

अरूण दुबे, पत्नीसोबत उज्जैनला गेला. पण त्यानं आजारी आईला घरातच बंद केले. तहान आणि भुकेनं व्याकूळ झालेल्या आजीनं जीव सोडला. मानसिक रोगी असणाऱ्या अरूणने मोठ्या भावाला फोन करून आम्ही उज्जैनला आलोय, आई घरातच असल्याचे सांगितले. आईची प्रकृती माहित असल्यामळे मोठ्या भावाने एका व्यक्तीला घरी पाठवले. त्यावेळी आईनं या जगाचा निरोप घेतल्याचं समजले. पोलिसांनी याप्रकरणी अरूण दुबे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय.

वृद्ध
Panvel Crime : आधी महिलेचा पाठलाग, मग घडलं भयंकर; पनवेलमधील हत्येचं गूढ अखेर उलगडलं

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा अरुण दुबे, पत्नी आणि मुलासोबत उज्जैनला गेला होता. त्याने आजारी आई ललिता दुबे यांना घरातच कोंडून ठेवले होते. दोन दिवस उपाशी व तहानलेल्या वृद्ध महिलेचा तडफडून मृत्यू झाला. घरातून दुर्गंधी आल्याने शेजार्‍यांनी पोलीसांना बोलावले होते. पोलिसांनी अरूणच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. अरूण माणसिक रोगी असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलेय.

अरुण दुबे यांच्या निष्काळजीपणामुळेच वृद्ध ललिता देवी यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसाच्या तपासात समोर आले. पोलिसांनी त्या आधारावर अरूण याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. 80 वर्षीय ललिता दुबे तिचा लहान मुलगा अरुणसोबत घरात राहत होत्या. १९ ऑक्टोबर रोजी ललिता देवी यांचा मृतदेह घराचे कुलूप तोडून बाहेर काढण्यात आला.

वृद्ध
Cyber Crime : नऊशे रुपयांचा ड्रेस पडला एक लाखात; महिलेची ऑनलाईन शॉपिंगमधून फसवणूक

दोन दिवसांपूर्वी अरुण दुबे घराला कुलूप लावून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत उज्जैनला गेला. अरूण दुबे यानं दोन दिवसानंतर मोठ्या भावाला आई घरातच असल्याचे सांगितले. ललिता देवी यांचा मोठा मुलगा अजय दुबे याने आपल्या घराकडे एका व्यक्तीला पाठवले. अजय दुबे पोलिसात उपनिरीक्षक म्हणून काम करतो.

वृद्ध
Kalyan Crime : कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला भयंकर मारहाण, दगड पायावर मारून केलं गंभीर जखमी; घटना कॅमेऱ्यात कैद,VIDEO

८० वर्षीय ललिता देवी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्या बहुतेक वेळा अंथरुणावरच असायच्या. औषध, अन्न व पाणी वेळेवर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लहान मुलगा जर मानसिकदृष्ट्या कमकुवत होता तर मोठ्या मुलाने आईला आपल्याकडे का ठेवले नाही? याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com