Deadly Boat Fire in Congo Kills 148 AI Photo
देश विदेश

Boat Accident : ५०० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, १४८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Congo Boat Accident : काँगोमधील मबंडाका शहराजवळ लाकडी नावेला आग लागून ५०० प्रवाशांची नाव उलटली. या भीषण दुर्घटनेत १४८ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत.

Namdeo Kumbhar

Deadly Boat Fire in Congo Kills 148 : डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. ५०० लोकांना घेऊन जाणाऱ्या लाकडी बोटीला नदीमध्येच आग लागली. आग इतकी भयावह झाली की लाकडी नाव नदीत उलटी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. १०० जणांना वाचवण्यात यश आले आहे. पण अद्याप अनेकजण बेपत्ता आहे, त्यांचा शोध घेतला जात आहे. ही दुर्देवी घटना मबंडाका या शहराजवळ घडली. बोट दुर्घटनेमुळे कांगोमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा काँगोतील जलवाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

मंगळवारी रात्री काँगो नदीत ही भीषण नाव दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १०० हून अधिकजण अद्याप बेपत्ता आहे. ५०० प्रवाशांना घेऊन जाणारी नाव नदीत उलट्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. मटानकुमु बंदरातून ही लाकडी नाव 'एचबी काँगोलो'ला निघाली होती, मबंडाका शहराजवळ नावेला आग लागली आणि खळबळ उडाली अन् नाव पलटी झाली.

स्वयंपाक करत असताना बोटीला आग लागली, त्यामुळे हा अपघात घडला. आगीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी नदीत उड्या मारल्या. पण अनेकांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने दिली. या दुर्घटनेत वाचलेल्या अनेक प्रवाशांना गंभीर भाजलेल्या अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

रेड क्रॉस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. पण अपुऱ्या संसाधनांमुळे आणि नदीच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, काँगोमध्ये अशा दुर्घटना वारंवार घडतात. जुनी लाकडी नाव आणि जादा प्रवासी क्षमतेमुळे सुरक्षितता धोक्यात येतेय. गेल्या काही वर्षांत अशा अपघातांमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Central Railway: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सीवूड्स-उरण मार्गावर २० अतिरिक्त लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT