Akola News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; अकोल्यात खळबळ

Akola ASI Jagdish Shinde suicide case : अकोला शहरातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केली. मूळगावी विषप्राशन केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत.
Akola ASI Jagdish Shinde suicide case
Akola ASI Jagdish Shinde suicide case
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Police Latest News : अकोला शहरात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जगदीश शिंदे हे अकोला पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांनी आपल्या मूळगावी, म्हैसपूर येथे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने अकोल्यातली सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारावेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अकोला पोलीस दलात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

जगदीश शिंदे यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण एएसआयने आत्महत्या केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला इतके टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणारी परिस्थिती काय असेल, याबाबत अकोल्यात चर्चा सुरू आहे. जगदीश शिंदे यांचे कुटुंबीय, सहकारी आणि स्थानिकांमध्येही या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात येत आहे. जगदीश शिंदे यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक, कौटुंबिक की कामाच्या ठिकाणी तणाव होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Akola ASI Jagdish Shinde suicide case
KEM Hospital : मांडीवर अन् पाठीवर हात टाकला, वरिष्ठ डॉक्टरावर ६ महिला डॉक्टरांचा विनयभंगाचा आरोप

जगदीश शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी अकोल्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अकोला पोलिसांकडून याचा तपास सुरू केला आहे. जगदीश शिंदे यांच्या कुटुंबीयांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी अकोला पोलिस प्रशासनाकडून अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Akola ASI Jagdish Shinde suicide case
Uddhav Thackeray : टाळी दोन्ही हातानं वाजली! राज ठाकरेंसोबत जाण्यास उद्धव ठाकरे तयार, पण ठेवली एक अट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com