Colonel Sophia Qureshi Saam Tv
देश विदेश

Success Story: PHD चे शिक्षण अर्धवट सोडले, स्वतः चे स्वप्न बाजूला ठेवून झाली सैन्यात भरती; कर्नल सोफिया कुरेशी यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of Colonel Sophia Qureshi: कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची सर्व माहिती दिली होती. त्यांना शास्त्रज्ञ व्हायचे होते. परंतु स्वतः चे स्वप्न बाजूला ठेवून त्यांनी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर करत ९ दहशतवाही अड्डे उडवून दिले. यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी माहिती दिली.या दोन्ही अधिकाऱ्यांचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत? (Who Is Colonel Sophia Qureshi)

सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात कर्नल पदावर कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. त्यांच्या पूर्वजांनी अहिल्याबाई होळकर यांच्यासोबत स्वातंत्र्य लढ्यात कामदेखील केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोफिया कुरेशी यांचे वडिल आणि आजोबादेखील लष्करात कार्यरत होते.

सोफिया कुरेशी यांचा प्रवास (Sophia Qureshi Success Story)

मिडिया रिपोर्टनुसार, सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या आहेत. गुजरातमधील वडोदरा येथेत त्यांचे बालपण गेले. सोफिया कुरेशी यांनी वडोदरा विद्यापीठातून बॅचलर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली. त्यानंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये मास्टर्स केले.

सोफिया यांचे वडीलदेखील भारतीय सैन्यात कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीएचडीचेदेखील शिक्षण घेतले आहे.

सोफिया कुरेशी यांची बहीणदेखील भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी इच्छूक होती. परंतु काही कारणांनी त्यांचे सिलेक्शन झाले नाही. त्यामुळे सोफिया यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीएचडीचे शिक्षण शेवटच्या वर्षात सोडले आणि लष्करात भरती होण्याची तयारी केली.

स्वतः चे स्वप्न बाजूला ठेवून लष्करात भरती (Colonel Sophia Qureshi Success Story)

सोफिया यांच्या जुळ्या बहिणींने त्यांच्याबाबत माहिती दिली आहे. सोफिया यांना डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करायचे होते. तिला एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करायचे होते. परंतु त्यानंतर तिने भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. खरंतर मला लष्करात भरती व्हायचे होते. परंतु तिची पहिल्याच प्रयत्नात लष्करात निवड झाली. खरंतर हे माझे स्वप्न होते. परंतु तिला जेव्हा युनिफॉर्ममध्ये बघते तेव्हा ती माझे स्वप्न जगतेय, असं मला वाटतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT