देश विदेश

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Colombia Air Force Plane Crash: कोलंबियामध्ये हवाई दलाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. विमानात एकूण 110 लोक प्रवास करत होते.

Bharat Jadhav

कोलंबियन हवाई दलाचे विमान कोसळले. हे विमान लॉकहीड मार्टिन सी-१३० हर्क्युलस प्रकारचे होते, ज्याचा वापर मोठ्या मोहिमांदरम्यान सैनिकांच्या वाहतुकीसाठी केला जातो. कोलंबियन हवाई दलाचे विमान कोसळले. हे विमान लॉकहीड मार्टिन सी-१३० हर्क्युलस प्रकारचे होते, ज्याचा वापर मोठ्या मोहिमांदरम्यान सैनिकांच्या वाहतुकीसाठी केला जातो.

कोलंबियामध्ये सोमवारी एक मोठी विमान दुर्घटना घडली. कोलंबिया हवाई दलाचे 'सी-130 हरक्यूलिस' हे विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या विमानामध्ये एकूण ११० जवान प्रवास करत होते. हे विमान पेरूच्या सीमेजवळ असलेल्या प्यूर्टो लेगुइजामो येथून सैनिकांना घेऊन जात असताना दुर्दैवी अपघात झाला. त्यानंतर कोलंबियाच्या सैन्यदलात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अपघात इतका भयंकर होता की विमान आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले. या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली? विमान कोसळण्याचे कारण काय होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या घटनास्थलावर बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे कोलंबियात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे विमान मानवी वस्तीपासून साधारण ३ किलोमीटर दूर अंतरावर कोसळले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दुर्घटनाग्रस्त विमान दक्षिण भागातील पुटुमायो (Putumayo) प्रांतातील ला तागुआ धावपट्टीवरून उड्डाण करत असताना कोसळल्याची माहिती स्थानिक प्रसार माध्यमांनी दिली. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर तातडीने राबवण्यात आलेल्या मोहिमेत किमान २० जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. तर इतर जवानांचा शोध अद्याप सुरू आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्षांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

'भोंदूबाबामुळे पुरोगामी महाराष्ट्राची बदनामी' खरातचे पाप, सरकारच्या डोक्याला ताप

SCROLL FOR NEXT