Telangana Aircraft Crashed: मोठी दुर्घटना! भारतीय वायुसेनेचे ट्रेनर विमान कोसळलं; २ वैमानिकांचा मृत्यू

Telangana Breaking News: तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे. दुर्घटनेत दोन भारतीय वायुदलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला.
Telangana Breaking News
Telangana Breaking NewsSaamtv

Telangana Air Craft Crashed:

तेलंगणामधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे. मेडक जिल्ह्यात ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन भारतीय वायुदलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक वैमानिकांध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे.

तेलंगणामध्ये (Telangana) हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले आहे. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (४, डिसेंबर) सकाळी ८.५५ वाजता हा अपघात झाला. भारतीय हवाई दलाने या अपघाताची माहिती दिली आहे. वायुसेनेने सांगितले की, आज सकाळी नियमित प्रशिक्षणादरम्यान PC 7 Mk II विमानाला अपघात झाला. त्यात दोन पायलट होते.

दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, यामध्ये कोणत्याही नागरिकाची जीवितहानी झालेली नाही. एअरफोर्स अकादमीत प्रशिक्षणादरम्यान दिंडीगुलमध्ये हा अपघात झाला. मृतांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Telangana Breaking News
Washim News : ट्रक चालकाकडून ३०३ क्विंटल गव्हाच्या पोत्याचा अपहार; शेलू बाजार समितीतील प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील मेडक जिल्ह्यात हा अपघात झाला. विमानात भारतीय हवाई दलाचे दोन अधिकारी होते. हा अपघात झाला तेव्हा विमान तूप्रन भागात होते. एअरफोर्स अकादमी डुंडीगल येथून विमानाने उड्डाण केले होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला...

या दुर्घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही दुःख व्यक्त केले आहे. "हैदराबादजवळ झालेल्या या अपघातामुळे दुःख झाले. यात दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागलाया दु:खद प्रसंगी मृत वैमानिकांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत, असे ते म्हणालेत. (Latest Marathi News)

Telangana Breaking News
Manoj Jarange News: गिरीश महाजनांनी मराठा समाजाला नडू नये; अन्यथा 'त्या' रेकॉर्डिंग व्हायरल करू, जरांगेंचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com