अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या विमानात एका २७ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. पाकिस्तानातील कराची विमानतळावर हे विमान लँड करण्यात आले.
अहमदाबादहून स्पाइसजेटचे विमान दुबईला जात होते. या विमानात अचानक एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेतल वैमानिकाने विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे अहमदाबादहून निघालेलं स्पाईसजेटच्या बोईंग-737 फ्लाइटचे कराचीमध्ये इमर्जन्सी लँडिग करण्यात आले.
एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, धारवाल धरमेश या तरुणाला प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे अहमदाबादवरुन दुबईला जाणारे विमान कराचीच्या जिन्ना विमानतळावर लँडिग करण्यात आले आहे.
त्यानंतर तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तरुणाची शुगर लेव्हल कमी झाली होती आणि हृदयाचे ठोके वाढले होते. उपचार केल्यानंतर तरुणाच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. त्यानंतर विमान पुन्हा दुबईच्या दिशेने रवाना झाले.
यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी हैदराबादहून जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाला मेडिकल इमर्जन्सी आली होती. यानंतर विमानाचे कराची येथे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातील प्रवाशाला मृत घोषित करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.