Weather Update yandex
देश विदेश

Weather Update: उत्तर भारतात थंडीची लाट, दिल्ली-NCR मध्ये दाट धुके आणि बर्फवृष्टी

Delhi Weather Update: दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुके आणि थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. दिल्लीत तापमान कमी असून धुके आहे. काश्मीरमध्ये थंडीची लाट तीव्र असून पारा उणे 11 अंशांपर्यंत घसरला आहे.

Dhanshri Shintre

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीसह देशभरातील अनेक भागांमध्ये हवामानात बदल जाणवला आहे. डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी सुरू असताना, उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट कायम आहे. हवामान खात्याने दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये घनदाट धुक्याचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी थंडीची तीव्रता वाढली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

बुधवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआरमध्ये घनदाट धुके पसरले असून, तापमान खूपच कमी असल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेत थंडीपासून बचाव करत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दिल्लीत अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. राजधानीच्या अनेक भागांमध्ये धुके, हलके धुके आणि काही ठिकाणी मध्यम धुक्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दुपारी वाऱ्याचा वेग ताशी १४ ते १८ किलोमीटरपर्यंत वाढेल, तर संध्याकाळपर्यंत तो हळूहळू कमी होऊन ताशी ८ किलोमीटरवर येईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दिल्लीत कमाल तापमान १७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ८ अंश सेल्सिअस राहील. काश्मीर खोऱ्यात थंडीची तीव्रता वाढली असून, तेथील नागरिकांसाठी ती मोठी समस्या ठरत आहे.

'स्कीइंग'साठी प्रसिद्ध गुलमर्ग येथील किमान तापमान उणे ११.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हलकी आणि नंतर मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ०१ आणि ०२ जानेवारी रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ०३ ते ०६ जानेवारीदरम्यान मध्यम ते मुसळधार बर्फवृष्टी होईल, तर ०४ ते ०६ जानेवारीदरम्यान काही ठिकाणी जोरदार हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जाणून घ्या शहरातील तापमान

दिल्ली- ८ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि १८ अंश सेल्सिअस कमाल तापमान

नोएडा- १० अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २१ अंश सेल्सिअस कमाल तापमान

गाझियाबाद- ९ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि १८ अंश सेल्सिअस कमाल तापमान

पाटणा- १२ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २३ अंश सेल्सिअस कमाल तापमान

लखनौ- ११ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २३ अंश सेल्सिअस कमाल तापमान

जयपूर- १० अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २२ अंश सेल्सिअस कमाल तापमान

भोपाळ- ८ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २२ अंश सेल्सिअस कमाल तापमान

मुंबई- १७ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान

अहमदाबाद- १६ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २९ अंश सेल्सिअस कमाल तापमान

जम्मू- ६ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २० अंश सेल्सिअस कमाल तापमान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT