Cockroach Janta Party Founder Abhijit Deepke Saam tv
देश विदेश

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Cockroach Janta Party Founder Abhijit Deepke: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत अभिजीत दीपके यांनी महत्वाची माहिती दिली. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Priya More
  • कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट

  • धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू राहणार

  • अभिजीत दीपके यांनी दिली माहिती

  • दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनात हजारो आंदोलक सहभागी

मोदी सरकारविरोधात कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा पार्टीकडून देण्यात आला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. अशामध्ये हे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार याबाबत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. रविवारी त्यांनी सांगितले की, परीक्षा आणि भरती चाचण्यांमधील कथित अनियमततेविरोधातील आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देईपर्यंत सुरूच राहील.

अभिजीत दीपके यांनी सांगितले की, शनिवारी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर सुमारे ७००० जणांच्या सहभागाने झालेले त्यांचे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. हे आंदोलन आता देशभरात पसरेल. अभिजीत दीपके हे आज सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळूज भागातील आपल्या निवासस्थानी आले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाची पुढची भूमिका सांगितली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही.

अभिजीत दीपके यांनी पुढे असे सांगितले की, जंतर मंतर येथील आंदोलन यशस्वी झाले कारण त्यात ६ ते ७ हजार लोकांनी सहभाग घेतला होता. हे आंदोलन देशव्यापी असेल. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. हे आंदोलन देशव्यापी करण्यासाठी आम्ही लवकरच एक कृती आराखडा तयार करू.'

शनिवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली हजारो आंदोलक जमले. परीक्षा आणि भरती चाचण्यांमधील कथित अनियमिततेवरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दीपके यांनी आंदोलकांना घाबरण्याची गरज नाही असे सांगितले. नंतर राष्ट्रीय राजधानीत एका पत्रकार परिषदेत, सीजेपीच्या प्रवक्त्यांनी जाहीर केले की, एकतर केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करावे किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः राजीनामा द्यावा. यासाठी ते एका आठवड्याची वाट पाहतील. यानंतर ते देशव्यापी आंदोलन सुरू करतील, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर - संभाजीनगर महामार्गांवर अपघात....

Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई मिळणार; सरकारची मोठी घोषणा

Soaked Raisins Benefits: रोज सकाळी ५ भिजवलेले मनुके खा; शरीराला मिळतील हे 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT