कॉकरोच जनता पार्टीचं वादळ दिल्लीत धडकणार; अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून केली मोठी घोषणा

Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून मोठी घोषणा केली. त्यांनी दिल्लीत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
Cockroach Janta Party Founder Abhijit Deepke
Cockroach Janta Party Founder Abhijit DeepkeSaam tv
Published On
Summary

कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंची अमेरिकेतून मोठी घोषणा

दीपके यांच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ

सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. युवकांच्या नव्या पक्षाचे सोशल मीडियावर मोजक्या काही दिवसांत प्रस्थापित पक्षांहून अधिक फॉलोवर्स झालेत. २० लाखांहून अधिक फॉलोवर्स असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून मोठी घोषणा केली आहे. अभिजीत दीपके यांच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी भारतात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दिल्लीत मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचेही जाहीर केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.

Cockroach Janta Party Founder Abhijit Deepke
Cockroach Janata Party : सरकारची चूक! शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; कॉकरोच पार्टीचा संताप

अभिजीत दीपके यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओतून दीपके यांनी समर्थक आणि विद्यार्थ्यांना आंदोलन पुकारण्याचं आवाहन केलं'.

व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं की, 'आता सर्वांनी एक येण्याची वेळ आली आहे. संविधानाच्या मार्गाने आणि शांततेत विचार मांडायला हवेत. युवकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागायला हवा. सर्वांनी एकत्र येऊन सरकारकडे मागणी करायला हवी'.

दीपके यांनी पुढे म्हटलं की, मी ६ जून रोजी शनिवारी सकाळी दिल्लीला पोहोचेल. सर्व युवक विमानतळावर स्वागतासाठी येऊ शकतात. त्यानंतर आपण सर्व जण मिळून संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी परवानगी मागू'.

Cockroach Janta Party Founder Abhijit Deepke
'दिल्ली विमानतळावर उतरताच, पोलीस तुरुंगात टाकतील'; कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेला अटकेची भीती?

अभिजीत दीपके यांनी काय म्हटलं?

अभिजीत दीपके यांनी व्हिडिओ शेअर करत भारतात परतणार असल्याची घोषणा केली. त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी करण्यासाठी भारतात येणार असल्याचे जाहीर केले. दीपके यांच्या दाव्यानुसार, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. नीट पेपरफुटीवरून घेतलेल्या भूमिकेचं विद्यार्थी आणि तरुणांनी पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण व्यवस्थेत चुकीच्या गोष्टीत घडत असेल, तर त्याला विरोध करायला हवा. पेपर फुटीप्रकरणाची जबाबदारी कोणीतरी घ्यायलाच हवी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com