कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे मोठे शक्तिप्रदर्शन केले.
सीजेपीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अभिजीत दिपके अमेरिकेतून दिल्लीत पोहोचला.
नीट पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करणारे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके शनिवारी सकाळी अमेरिकेतून दिल्लीत आले आहेत. जंतर-मंतर येथे होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते राजधानीत पोहोचले असून, आगमनानंतर त्यांनी समर्थकांना शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केलं. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना विशेष संदेश दिला. विमानतळावरून बाहेर पडताना त्याने हातातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक दाखवलं. त्यावेळी नागरिकांना आंदोलनात सहभागी होणअयाचे आवाहन केलं. दरम्यान NEET, CUET, CBSE आणि SSC GD सारख्या मोठ्या परीक्षांमधील कथित गोंधळ आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून सीजेपीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.