Cockroach Janata Party founder Abhijeet Deepke  Saam Tv
देश विदेश

Cockroach Janata Patry: सोशल मीडिया अकाउंट बंद होताच कॉक्रोच जनता पार्टीनं उचललं मोठं पाऊल

Cockroach Janata Party founder Abhijeet Deepke: कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन केल्यानंतर या पक्षाने थेट हायकोर्टात धाव घेतली. यावेळी या पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

Priya More
  • कॉक्रोच जनता पार्टी अकाउंट बंदी प्रकरण

  • कॉक्रोच जनता पार्टीची दिल्ली हायकोर्ट याचिका

  • सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केल्याप्रकरणी गेले कोर्टात

  • अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले

कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर कॉक्रोच जनता पक्षाचे २० मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घातली होती.

सरकारने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या पक्षाचे अधिकृत एक्स अकाऊंटर ब्लॉक केले. सरकारच्या या निर्णयाला आव्हान देत कॉक्रोच जनता पार्टीने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. एनजी लॉ चेंबर्सचे वकील नकुल गांधी यांनी ही रिट याचिका दाखल केली. यावर २७ मे रोजी सुनावणी होणार आहे.

अभिजित दीपके यांनी सांगितले होते की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कॉक्रोच जनता पार्टीचे २,०१,००० फॉलोअर्स आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ज्येष्ठतेची मागणी करणाऱ्या एका वकिलावर नाराजी व्यक्त करताना परजीवी आणि झुरळ यांसारखे शब्द वापरले होते. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीची निर्मिती झाली.

सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्ट केले की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला होता आणि त्यांची टिप्पणी विशेषतः बनावट पदव्यांच्या आधारे वकिली व्यवसायात प्रवेश करणाऱ्यांना उद्देशून होती. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी १५ मे रोजी ही टिप्पणी केली आणि दुसऱ्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टी'ची स्थापना झाली. ही गोष्ट सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाली आणि तिला राजकारणी, कार्यकर्ते, कलाकार तसेच मोठ्या संख्येने तरुणांचा पाठिंबा मिळाला.

वाढत्या लोकप्रियतेला सरकार घाबरत असल्याचा आरोप केला जात आहे. दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीला एक उपहासात्मक व्यासपीठ संबोधून 'एक्स' अकाऊंट ब्लॉक करण्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, 'ते अकाऊंट आणि ती चळवळ झपाट्याने वाढत आहे. एक्स हँडल आणि ती चळवळ वाढत असून दररोज हजारो फॉलोअर्स जोडले जात आहेत. कदाचित यामुळे सरकार घाबरले असावे.' पूर्वी आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या अभिजित दिपके यांनी गुरुवारी एक्सवर पोस्ट केले होते की त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट देखील हॅक करण्याचे प्रयत्न होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; इंजिनमधून अचानक निघू लागला धूर

Akshay Kumar Troll: अक्षय कुमार बनला भोजपुरी 'आयटम बॉय'; 'घिस घिस घिस' गाण्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंग, मीम्स तुफान व्हायरल

Panvel Travel : शहराच्या गोंधळातून घ्या ब्रेक; पनवेलमधील डोंगररांगांनी वेढलेले 'हे' ठिकाण Summer ट्रिपसाठी बेस्ट

विदर्भात आजपासून 'नवतपा'! 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT