न्यायालयाने जामिनासोबत काही अटी घातल्याची माहिती
दिल्लीतील आंदोलनाच्या पुढील स्वरूपाबाबत उत्सुकता आहे.
सीजेपीचे नेते अभिजीत दीपके आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर
आता बातमी आहे सीजेपीच्या नेत्यांवर कोर्टानं लादलेल्या बंधनाची. सीजेपीचे अभिजीत दिपके आणि त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांना कोर्टानं सशर्त जामीन मंजूर केला. मात्र त्यांच्यावर कोर्टानं कोणत्या अटी लादल्या? आता सीजेपी आंदोलन करणार की थांबवणार? दिपकेंनी आता काय भूमिका घेतलीय? दिल्लीतल्या आंदोलनाचं भवितव्य काय? यावरचा हा विशेष रिपोर्ट.
सीजेपी नेते अभिजीत दिपकेंसह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना थेट विमानात घुसून अटक केल्यानंतर तब्बल २४ तासांनी कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे आता या तिन्ही नेत्यांवर काही बंधनं येणार आहेत. कोर्टानं त्यांच्यावर नेमक्या काय अटी लादल्या आहेत त्या पाहूयात.
एक वर्ष शांतता भंग होईल असं कृत्य करू नये
50 हजारांच्या जामीनपत्रावर तिघांची सुटका
एक वर्ष तिन्ही नेत्यांना चांगल्या वर्तणुकीच्या सूचना
पुढील एक वर्ष शांतता भंग करणारं कोणतंही कृत्य न करण्याचे निर्देश कोर्टानं तिघांना दिले आहेत. तिघांना 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसंच वर्षभर चांगल्या वर्तवणुकीच्या सूचनाही कोर्टानं तिघांना दिल्या आहेत. कोर्टानं अटी आणि शर्ती लादल्या असल्या तरी शांततेत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका सीजेपी नेत्यांनी मांडली.
तर आंदोलन करणार नाही अशी अट असलेल्या कोणत्याही हमीपत्रावर सही केलेली नाही असा दावा अभिजीत दिपकेंनी केलाय.तसंच लवकरच रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी आपल्या पोस्टमधून केलाय. जामीन मिळाल्यानंतर सीजेपी नेत्यांनी पुन्हा आपला मोर्चा ज्ञानेश कुमार आणि मोदी-शाहांकडे वळवलाय.
आरएसएसनंही ज्ञानेश कुमारांना हटवण्याची भूमिका घेतल्याचा दावा सौरव दास यांनी केलाय. मात्र ज्ञानेश कुमारांकडे काहीतरी मोठं गुपित असल्यामुळेच मोदी-शाह त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सीजेपीनं केलाय. तर भाजपनं या आरोपांना जोरदार उत्तर देत सीजेपी नेत्यांवर पलटवार केलाय.
कोर्टाच्या शर्तीनंतरही सीजेपी नेत्यांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवलीय. एवढंच नव्हे तर जंतरमंतर ही आंदोलनाची अधिकृत जागा असल्यामुळे त्याठिकाणीच आंदोलन करण्याचे संकेत सीजेपीच्या नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी हे तिन्ही नेते थेट दिल्लीच्या रस्त्यांवर उतरून आंदोलन करणार का? जंतरमंतर जाण्याचा पुन्हा प्रयत्न करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.