चीनने केल्या काही दिवसांमध्ये लष्करात मोठे फेरबदल केले असून लष्करी अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. लष्कराच्या ९ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यात ३ रॉकेट फोर्स कमांडरचा समावेश आहे. रॉकेट फोर्स चीनमधील अण्वस्त्रांवर लक्ष ठेवते. चीनने तडकाफडकी असे पाऊल का उचलले याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र चीनने घेतलेल्या या निर्णयामागे काहीतरी रणनीती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चीनी समुद्रात हालचाली लाढण्याची शक्यताही विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे जगाच्या नजरा चीनवर खिळल्या आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी संरक्षणमंत्रीच बदलले आहेत. त्यांच्या जागी नौदल प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. नौदल प्रमुख होण्यापूर्वी डोंग जून हे चीनच्या सदर्न थिएटर कमांडचे डेप्युटी कमांडर होते. सदर्न थिएटर कमांड चिनी नौदलाचा भाग असून दक्षिण चीन समुद्र आणि तैवान सामुद्रधुनीच्या आसपासच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डोंग जून हे तैवान आणि चिनी समुद्राचे तज्ज्ञ आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तैवानपासून दक्षिण चीन समुद्रापर्यंतचं मोठं काम जिनपिंग यांनी डोंग यांनी सोपवलं असावं. त्यामुळे तैवानवरील हल्ल्याचा धोका वाढल्याचं सांगितलं जात आहे. चीन आणि तैवानमधील वाद आता जगाला काही नवा नाही. तैवानवर चीन नेहमीच दावा सांगत आला आहे. मात्र तैवानने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. वास्तविक चीनला दक्षिण चीन समुद्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. दक्षिण चीन समुद्रातील इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनेई दारुसलाम, फिलीपिन्स, तैवान भागांवरून वाद आहे. जगातील सर्वात व्यस्त जलगार्ग असल्यामुळे या भागावर चिनला वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. त्यामुळे नौदल प्रमुखांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केल्यामुळे याला पुन्हा एकदा महत्त्व आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.