Indian Politics: 'दीदींनाच युती नको आहे...',अधीर रंजन चौधरींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल , इंडिया आघाडीत संघर्ष वाढतोय का?

Indian Alliance News: पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपावरून वाद वाढत आहे. अलिकडेच ममता यांनी भाजपला पराभूत करण्याची ताकद एकट्या तृणमूल काँग्रेसमध्ये असून इंडिया आघाडीची युती राष्ट्रीय स्तरावर असेल. बंगालमध्ये आपण निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं.
Indian Politics
Indian PoliticsSaam Digital
Published On

Indian Politics

पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपावरून वाद वाढत आहे. अलिकडेच ममता यांनी भाजपला पराभूत करण्याची ताकद एकट्या तृणमूल काँग्रेसमध्ये असून इंडिया आघाडीची युती राष्ट्रीय स्तरावर असेल. बंगालमध्ये आपण निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर शनिवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत, दीदींचाच युतीला विरोध असल्याच म्हटलं आहेत. तसेच डाव्या पक्षांशी युती करण्याबाबत अधिक सजगता दाखवली आहे.

तीन वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले अबू हसिम खान चौधरी यांनी, बंगालमध्ये काँग्रेसला तृणमूलसोबत युती हवी आहे. पण कोण कोणासोबत येईल आणि कोण नाही याला महत्त्व नाही. ममतांना युती नको आहे, अशी त्यांची तक्रार आहे. काँग्रेस कोणाचीही वाट पाहणार नाही, एकट्याने लढण्याची क्षमता असल्याचा अधीर यांचा दावा असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान आज अधीर रंजन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीबाबत भाष्य केलं. बंगालमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तृणमूलही स्वबळावर लढत आहे. आम्ही जसे आहोत तसे लढत आहोत. कोण आलं कोण गेलं याने काही फरक पडत नाही. मुर्शिदाबादमध्ये तृणमूल-भाजपचा पराभव एकदाच नाही तर वारंवार होत आहे. त्यांचा पराभव मी पुन्हा करीन, असा दावा त्यांनी यावेळी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indian Politics
Vinesh Phogat Returned Arjuna Award: 'असा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये...', कुस्तीपटू विनेश फोगटने अर्जुन पुरस्कार सोडला कर्तव्य पथावर

बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूल एकत्र लढणार की नाही या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले. ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीबाबत अनेकवेळा मत व्यक्त केलं आहे. स्वत: दीदींनाच युती नको आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. मी याआधीही म्हटलं आहे की जिथे काँग्रेसची ताकद आहे तिथे काँग्रेस लढेल.

आमने सामनेची लढाई असतानाही तृणमूल एकला चलो रे ची भूमिका सोडत नाही. ममता बॅनर्जी यांनी तसा संदेश यापूर्वीच दिला आहे. संपूर्ण भारतात इंडिया आघाडी असली तरी बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एकटीच लढणार आहे. तृणमूल इंडिया आघाडीला मार्गदर्शन करेल. असं अधीर रंजन चौधरी म्हणाले आहेत.

Indian Politics
Rajasthan Politics: भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, २२ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, कोणाकडे कोणती जबाबदारी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com