China Train Accident Saam Tv
देश विदेश

Train Accident: मोठा रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू

China Train Accident: चीनमध्ये भयंकर रेल्वे अपघात झाला. ट्रेनने १३ जणांना चिरडलं. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले. हे सर्व रेल्वे कर्मचारी होते. रेल्वे रूळावर काम करत असताना ही घटना घडली.

Priya More

Summary -

  • युनान प्रांतात चाचणी ट्रेनच्या धडकेत ११ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाला

  • रेल्वे रुळांवर काम सुरू असताना अचानक ट्रेन आल्याने भीषण अपघात झाला

  • दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

  • अपघाताची चौकशी सुरू असून जबाबदारांवर कारवाई केली जाणार

चीनमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला. चीनच्या युनान प्रांतामध्ये ट्रेनच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू झाला. रेल्वे रुळावर काम करत असताना अचानक ट्रेन आली आणि तिने एक एक करत १३ जणांना चिरडले. या अपघातामध्ये ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या रेल्वे अपघातामुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील कुनलिंग लुओयांग टाऊन स्टेशनजवळ हा रेल्वे अपघात झाला. ट्रेनने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एका ग्रुपला जोरदार धडक दिली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भूकंपीय उपकरणांच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एका चाचणी ट्रेनने या रेल्वे कर्मचाऱ्यांना चिरडले. ही ट्रेन नेहमीप्रमाणे जात असताना कुनमिंग लुओयांग टाऊन रेल्वे स्टेशनजवळ वळणावर तिने रेल्वे कर्मचाऱ्यांना धडक दिली.

या अपघातामध्ये १३ जण गंभीर जखमी झाले होते. यामधील ११ जणांनी जागीच प्राण सोडले. दोन गंभीर जखमी रेल्वे कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर लगेचच रेल्वे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी आपत्कालीन मदत कार्य सुरू केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भयंकर अपघतानंतर घटनास्थळी बचावकार्य करत जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

या रेल्वे अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे. या अपघाताला जबाबदार असणाऱ्यावर कायदेशीर आणि नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे. या अपघातानंतर काही काळ रेल्वेसेवा ठप्प झाली होती. पण आता रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

मविआमध्ये राज ठाकरे पाहिजेच, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, बैठकीत नेमके काय घडले? VIDEO

कोणत्या भाजीमध्ये खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

Maharashtra Politics: निवडणुकीत पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; महायुतीत चाललंय काय?

HCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार पगार १.२० लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT