India China Relations Latest Update Saam Tv
देश विदेश

INDIA-China News : चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या सुरुच, सीमेवर वेगाने सुरु असलेल्या हालचालींमुळे चिंता वाढली

प्रविण वाकचौरे

INDIA-China News :

चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या लपूनछपून सुरुच आहेत. भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच LAC वर सैन्य आणखी वाढवलं आहे. याशिवाय पायाभूत सुविधा देखील वाढवण्यास सुरुवात केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनच्या वार्षिक अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटलं की, गेल्या एक वर्षात चीनने भारताला जोडून असलेल्या सीमेवर सैन्य वाढवलं आहे. पायाभूत सुविधाही सातत्याने निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा चिंता वाढू लागली आहे. (Latest News)

पेंटागॉनच्या अहवालात म्हटले आहे की, २०२२मध्ये अंडरग्राऊंड बंकर, नवीन रस्ते, भूतानजवळ नवीन गावे, पंगोंग लेकवरील दुसरा पूल, विमानतळ आणि हेलिपॅड विकसित केले आहेत. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, LAC च्या पश्चिम भागात चार संयुक्त शस्त्रास्त्र ब्रिगेड (CAB) राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अण्वस्त्रांमध्येही वाढ

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानेही आपल्या अहवालात म्हटले आहे की, चीनने गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांची संख्याही वाढवली आहे. पूर्वीपेक्षा जास्त अण्वस्त्रांची निर्मिती केल्यामुळे आता त्यांच्याकडे ५०० अण्वस्त्रे आहेत. २०३० पर्यंत १००० अण्वस्त्रे बनवण्याचे चीनचे उद्दिष्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT