Airplane Crashed in Pune : बारामतीजवळ शेतात विमान कोसळलं, परिसरात एकच खळबळ

Pune Latest News : विमान दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Pune NEws
Pune NEws Saam TV

Pune News :

पुण्यातील बारामतीजवळ विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. बारामतीतील कटफलजवळील शेतात हे विमान कोसळलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रेड बर्ड कंपनीचं हे विमान आहे. शिकाऊ पायलट हे विमान चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आठवडाभरातील विमान दुर्घटनेची ही दुसरी घटना आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातात विमानाच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर विमान उलटं झालं आहे. आजच्या अपघातात नेमकं कारण काय याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. विमान अपघातात पायलट जखमी झाल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

Pune NEws
Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर, शहरात लवकरच धावणार मेट्रो; PM नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळलं होतं. त्यानंतर आज पुन्हा घडलेल्या दुर्घटनेमुळे वैमानिकांसह आसपासच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pune NEws
Maratha Reservation: धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं जीवन; नांदेडच्या घटनेनं राज्यभरात खळबळ

बारामतीत विमान प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. मात्र मागील काही दिवसात ही पाचवी दुर्घटना असल्याने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या दुर्घटनांचं नेमंक कारण काय याचा तपास करण्याची आवश्यकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com