Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर, शहरात लवकरच धावणार मेट्रो; PM नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Navi Mumbai Metro: नवी मुंबईत लकरच मेट्रो धावणार आहे. या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.
Navi Mumbai Metro
Navi Mumbai MetroSaam tv

सुनील काळे

Navi Mumbai News:

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. नवी मुंबईत लकरच मेट्रो धावणार आहे. या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या संभाव्य नवी मुंबई दौऱ्यात मेट्रो उद्घाटनाचा कार्यक्रम आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

नवी मुंबईच्या मेट्रोच्या उद्घाटनासह त्याच दिवशी नमो महिला सशक्तीकरण मोहिमेचा शुभारंभ नवी मुंबईत केल्या जाण्याची शक्यता आहे. नमो महिला सशक्तीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करण्याची शक्यता आहे.

नमो महिला सशक्तीकरण मोहिम शुभारंभ आणि नवी मुंबई मेट्रो उद्घाटनाची तयारी करण्यासाठी आज शनिवारी खारघरमध्ये शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navi Mumbai Metro
Political News: मविआत होणार 'वंचित'ची एंट्री? शरद पवार यांच्या भेटीनंतर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ हा 30 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. यावेळी नवी मुंबई मेट्रो आणि सूर्या पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतील या कार्यक्रमाची जबाबदारी रायगड जिल्हाधिकारी आणि सिडकोवर सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाची माहिती साम टिव्हीच्या हाती आली आहे.

कसं असेल कार्यक्रमाचं नियोजन?

नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभाचा कार्यक्रम हा नवी मुंबई विमानतळाच्या जागेवर होण्याची शक्यता आहे. यासाठी 6 लाख चौरस फुटाचा मंडप उभारला जाणार आहे.

तर जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारला जाणार आहे. 5 हजार टॉयलेट्सची सोय करण्यात आली आहे. तर उकाड्यासाठी कुलर आणि पंख्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर महिलांसाठी 4 हजार बसेसची सोय करण्यात आली आहे.

Navi Mumbai Metro
Maharashtra Politics: शरद पवार, अजित पवारांसह सुप्रिया सुळेही पहिल्यांदाच एका मंचावर; कधी अन् कुठे आहे कार्यक्रम?

नरेद्र मोदी शिर्डीच्या दौऱ्यावर

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीआधी विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका भाजप सरकारने लावल्याचे दिसून येत आहे. पीएम नरेंद्र मोदी हे २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान मोदी हे दुसऱ्यांदा शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत.

पंतप्रधान मोदी हे 2018 साली शिर्डीतील साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर पुन्हा 26 ऑक्टोबरला साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीआधी विकासकामांचा धडाका करत मतांचे गणित वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com