Terrorist: पाकिस्तानात अजून एक दहशतवाद्याचा खात्मा; भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदची हत्या

Terrorist: पाकिस्तानात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या गटातील दहशतवाद्याची हत्या झालीय.
Terrorist
TerroristX (Twitter )
Published On

Most wanted Terrorist :

पाकिस्तानात मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या हत्यांचं सत्र सुरूच आहे. मागील काही दिवसांपूर्वी भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची हत्या झाली होती. यात पठाणकोट हल्ल्यामागील मास्टर माईंड शाहिद लतीफ होता. तर दुसरा दहशतवादी आयएसआयचा एजंट मुल्ला बाहौर उर्फ होर्मुज हा होता. या हा दोघांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली होती. (Latest News)

आता ज्या दहशतवाद्याची हत्या झाल्याची बातमी हाती आली आहे, त्याचं नाव आहे दाऊद मलिक. हा जागतिक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा खास व्यक्ती होता. जैश-ए-मोहम्मदसह दाऊद मलिक हा लश्कर-ए-जब्बर आणि लश्कर-आय-जांगवी या संघटनेशी जुडलेला होता. मसूद अजहर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिमसह युएपीएयसह भारत सरकारने त्याला दहशतावादी घोषित केलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बालाकोटच्या एअर स्ट्राईकमध्ये बचावला होता मलिक

दाऊद मलिकची हत्या पाकिस्तानच्या वजीरीस्तानमध्ये करण्यात आली. येथे अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पाकिस्तानमध्ये असलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. दरम्यान भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अशा पद्धतीने टार्गेट करत त्यांचा खात्मा करण्याचं काम पाकिस्तानातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही सुरू आहे.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर जेव्हा भारतीय सेने बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. त्यावेळी तेथे दाऊद मलिक उपस्थित होता असं सांगण्यात येत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्या बालाकोटमधील हल्ल्यातून दाऊद बचावला होता. सर्व दहशतवादी आयएसआयच्या छत्रछायेखाली राहतात. परंतु पाकिस्तान या दहशतवाद्यांचं संरक्षण करत असते. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने मौलाना मसूद अझहर अफगाणिस्तानात असल्याचे सांगितले होते. त्याच्या अटकेसाठी अफगाणिस्तानला पत्र लिहिलं होतं.

आधी मारले गेले होते मोस्ट वॉन्टेड दहशतवादी

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ हा पाकिस्तानातील गुजरांवाला येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. शाहिद लतीफ हा २०१६ च्या पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जाते. ज्यात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद झाले होते. त्याने आयएसआयकडून विशेष प्रशिक्षण घेतले होते. लतीफकडे दहशतवादी संघटना, जैश-ए-मोहम्मदने सियालकोट सेक्टरचे प्रमुखाची जबाबदरी दिली होती.

तर दुसरा दहशतवादी हा आयएसआयच्या एजंट मुल्ला बाहौर उर्फ होर्मुज होता. बलुचिस्तान भागात त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना आयएसआयच्या ताब्यात देण्यात बाहौरचा हात होता. कूलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत ही जाधवांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

पाकिस्तान दहशतवाद्यांची हत्या

रावळपिंडीमध्ये २० फेब्रुवारीला बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाजची हत्या करण्यात आलीय. केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत याचे नाव होतं. इम्तियाज हा भारतात घुसखोरी करायचा. जम्मू-काश्मिरमध्ये घुसखोरी करून आयएसआयने त्याला हिजबूल मुजाहिदीनच्या लॉन्च पॅड संभाळण्याची जबाबदारी दिली होती.

गेल्या महिन्यात 'लष्कर-ए-तैयबा'चा प्रमुख हाफिज सईदचा सहकारी अबू कासिम याचीही रावळकोटमध्ये हत्या करण्यात आली होती. खलिस्तान कमांडो फोर्सचा अतिरेकी आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड परमजीत सिंग पंजवाड यालाही पाकिस्तानात अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केले होते. याशिवाय हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख दहशतवादी बशीर मीर उर्फ ​​इम्तियाज आलम आणि जैशचा दहशतवादी जहूर मिस्त्री यांचीही हत्या करण्यात आली होती. कंदहार विमान अपहरण प्रकरणात जहूर मिस्त्री सहभागी होता.

Terrorist
Shopian Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार, सुरक्षादलाच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com