Shopian Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार, सुरक्षादलाच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

Jammu Kashmir Encounter: शोपियान जिल्ह्यातील अलशिपोरा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
jammu kashmir news security forces killed two terrorist in shopian encounter
jammu kashmir news security forces killed two terrorist in shopian encounter Saam TV
Published On

Jammu Kashmir Shopian Encounter

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अलशिपोरा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक काश्मिरी पंडिताच्या हत्येत सामील होता, अशी माहिती समोर आली आहे. काश्मीर पोलिसांनी यासंदर्भातील माहिती X वरुन दिली आहे. (Latest Marathi News)

jammu kashmir news security forces killed two terrorist in shopian encounter
IMD Rain Alert: पुढील ४८ तासांत 'या' राज्यांमध्ये कोसळणार परतीचा पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

चकमकीनंतर जवानांकडून परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे याआधी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. गेल्या बुधवारी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी मारले गेले होते.

बासित अमीन भट आणि साकिब अहमद लोन अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दोघेही कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील कुज्जरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

माहिती मिळताच सुरक्षा दलानी परिसराला घेराव घालत शोधमोहिम सुरू केली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी सुद्धा या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले झाले.

घटनास्थळावरून त्यांचे मृतदेह सापडल्याचे प्रवक्त्याने सांगितले. ते म्हणाले की घटनास्थळावरून दोषी कागदपत्रे, शस्त्रे आणि काडतुसे आणि एके सिरीजच्या दोन रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी हे मोठे यश असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाचे अभिनंदन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com