China Earthquake Saam Tv
देश विदेश

China Earthquake CCTV : चीन भूकंपाने हादरला; किंचाळ्या अन् पळापळ... भयानक दृश्ये CCTV कॅमेरात कैद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

China Earthquake CCTV Video:

सोमवारी रात्री चीनच्या गान्सू प्रांतात भूकंपाचा तीव्र धक्का बसला. लिंक्सिया येथील जिशिशन काउंटीमध्ये ६.२ तीव्रतेचा धक्का बसला. हा संपूर्ण थरारक अनूभव सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

चीनमधील हा भूंकप खूप तीव्र होता. यात इमारती कोसळून ११६ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. या भागात बचावकार्य सुरू आहे.

चीनमधील गांसू प्रांतात १०५ जण ठार तर ४०० जण जखमी झाले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर किंघाई प्रांतातील हैदोंग शहरात ११ जणांचा मृत्यू तर १०० जण जखमी झाले आहेत.

भूकंपाचा हा संपूर्ण थरारक अनुभव सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ग्लोबल टाईम्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत संपूर्ण जमीन हादरताना दिसत आहे. इमारतीचा काही भाग कोसळत आहे. तसेच अनेक लोक जीव वाचवण्यासाठी दुकाने आणि ऑफिसमधून बाहेर पडताना दिसत आहे. यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. या भूकंपात अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत. तसेच खूप जास्त नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest News In Marathi)

एका रिपोर्टनुसार, या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. तर त्याची खोली अंदाजे १० किलोमीटर इतकी होती. भूकंपामुळे (Earthquake) चीनच्या गांसू-किंघाई सीमावर्ती भागातील अनेक इमारती कोसळल्या आहेत. याठिकाणी मृतांची संख्या देखील जास्त आहे. आतापर्यंत जवळपास २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT