Chile Earthquake Saam Tv
देश विदेश

Chile Earthquake: ब्रेकिंग! ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने चिली हादरलं; नागरिकांमध्ये घबराट

7.3 Magnitude Earthquake Hit Antofagasta On Thursday: दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये काल भूकंप झालाय. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Rohini Gudaghe

मुंबई: दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये काल १८ जुलै रोजी भूकंप झालाय. परंतु या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं अजून समोर आलेलं नाही. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने नोंदवले, की १८ जुलै रोजी गुरुवारी चिलीतील अँटोफागास्ता येथे ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय. अचानक जमिनीला हादरे बसु लागल्यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण होते.

यूएसजीएसने म्हटलंय की, भूकंपाचा केंद्रबिंदू सॅन पेड्रो डी अटाकामा शहरापासून ४१ किलोमीटर आग्नेय दिशेला १२८ किलोमीटर खोलीवर (Chile Earthquake) होता. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी भूकंपाचे व्हिडिओ पोस्ट केलेत. यामध्ये जमीन थरथरताना दिसत आहे. ब्राझीलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे काहींनी सांगितलं जातंय. होनोलुलु आपत्कालीन व्यवस्थापनाने सांगितले की, ओआहूमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

अधिकाऱ्यांनी अद्याप नुकसान आणि जखमींबद्दल काहीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. नाझ्का आणि दक्षिण अमेरिकन टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर असलेल्या स्थानामुळे चिली भूकंपप्रवण क्षेत्र आहे. गुरूवारी चिलीला भूकंपाचे (Chile Earthquake News) धक्के बसले आहेत. जानेवारीमध्ये ५.३ रिश्टर तिव्रतेचा भूकंप उत्तर चिलीच्या तारापाका प्रदेशात झाला होता. त्यांचा केंद्रबिंदू ११८ किमी खोलीवर होता. त्यावेळी देखील कोणतेही नुकसान झाले नव्हते.

चिली हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण (Earthquake) देशांपैकी एक आहे. हा देश पॅसिफिक महासागराच्या 'रिंग ऑफ फायर'वर वसलेला आहे. २०१० मध्ये ८.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर आलेल्या त्सुनामीने ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं (South America) होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT