Earthquake Video : जमीन हादरली, लोक पळतच सुटले; हिंगोलीतील भूकंपाचा थरारक VIDEO समोर

Hingoli Earthquake Video : हिंगोलीत भल्यापहाटे झालेल्या भूकंपाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Hingoli Earthquake Video
Hingoli Earthquake VideoSaam TV
Published On

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आज बुधवारी पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी नोंदवली गेली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावे, असे सांगण्यात आलंय. भूकंपामुळे काही घरांना तडे देखील गेल्याचं वृत्त आहे. दरम्यान, या भूकंपाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Hingoli Earthquake Video
Marathwada Earthquake : मराठवाड्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले? जाणून घ्या सविस्तर...

हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli News) औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचे हादरे बसले. माळधामणी गावात भूकंपाच्या घटनेनंतर अचानक जमिन हादरल्याने नागरिक घराच्याबाहेर पळाले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याने पायी चालत जाताना दिसून येत आहे.

तर काहीजण घराच्या पायऱ्यांवर बसून गप्पा मारत आहेत. त्याचवेळी अचानक जमिनीतून गुढ आवाज होऊन भूकंपाचा धक्का (Earthquake News) बसतो. घरातील भांड्यांची तसेच इतर वस्तूंची पडझड होण्याचा आवाज येतो. जमीन हादरत असल्याचं लक्षात येताच नागरिक चांगलेच धास्तावतात. सर्वजण आरडाओरड करत मोकळ्या जागेत पळत सुटतात.

अगदी १० सेकंदात घडलेला हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भूकंपाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. दरम्यान, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. भूकंपाच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले.

यापूर्वीही या भागात भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठविण्यात आल्याचं त्यांनी साम टीव्हीसोबत बोलतांना सांगितलं. दुसरीकडे हिंगोलीपाठोपाठ नांदेड, परभणी, जालना, बीडचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मात्र, नांदेड परभणी वगळता इतर कोणत्याही प्रशासनाने भूकंपाच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

Hingoli Earthquake Video
Heavy Rain Alert : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com