Basavaraj Bommai Saam TV
देश विदेश

Karnataka: मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केली महत्वाची घाेषणा; Weekend Curfew हटवला

या आधी कर्नाटक सरकारने गेल्या आठवड्यात राज्यातील वीकेंड कर्फ्यू मागे घेण्याचा निर्णय घेतला.

वृत्तसंस्था

कोरोना (Corona) बाधितांची आटोक्यात आलेल्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. कोरोनाच्या प्रकरणांसोबत देशात ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र असे असले तरी काही राज्यात आता निर्बंध शिथिल करण्यात येत आहे.

याबाबाद कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यातील वीकेंड कर्फ्यू मागे घेतल्याचा निर्णय ट्विट करुन घाेषीत केला आहे. दरम्यान परिस्थितीवर नियंत्रण ठेवत सरकार आणखी निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न करेल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी स्पष्ट केले आहे. (Chief Minister Basavaraj Bommai makes important announcement)

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोविड-19 परिस्थितीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तथापि, पुढील आठवड्यात कोरोनाबाधित रुंगणाची संख्या लक्षात घेऊन निर्बंध पुन्हा कडक करायचे की नाही यावर योग्य निर्णय बैठकीत घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रविवारी कर्नाटकात 50,210 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 मृत्यूची नोंद झाली आहे. ही दुसरी वेळ आहे जेव्हा राज्यात दैनंदिन रुग्णांच्या संख्याने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. याआधी 5 मे 2021 रोजी राज्यात 50,112 रुग्ण आढळून आले होते. तर गेल्या 24 तासात 22,842 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला, एकूण बरे झालेल्यांची संख्या 31,21,274 इतकी झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

Marathi Serial: अभिनेत्री समृद्धी केळकर दिसणार या मराठी मालिकेत

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

SCROLL FOR NEXT