Ghozali Ghozalu
Ghozali GhozaluSaam TV

Ghozali Ghozalu: सेल्फी विकून कोट्याधीश झाला तरुण! आता भीती वाटतेय

22 वर्षीय सुल्तान गुस्ताफ अल घोझाली इंडोनेशियातील सेमारंग येथील विद्यापीठात संगणक शास्त्राचं शिक्षण घेतो.

तंत्रज्ञानाच्या या युगात जग कुठे चालले आहे याची अनेकांना कल्पना नसते. आता इंडोनेशियन विद्यार्थ्याचेच उदाहरण घ्या, ज्याने स्वतःच्या सेल्फीचा (Selfies) NFT विकून तब्बल सुमारे साडेसात कोटी रुपये कमावले आहेत.

संगणकाचा कॅमेर्‍या सेल्फी काढण्यासाठी

22 वर्षीय सुल्तान गुस्ताफ अल घोझाली (Ghozali Ghozalu) इंडोनेशियातील सेमारंग येथील विद्यापीठात संगणक शास्त्राचं शिक्षण घेतो. 2017 ते 2021 पर्यंत, घोझाली त्याच्या संगणकाच्या कॅमेऱ्याने दररोज स्वतःचा एक सेल्फी फोटो काढत असे कारण या फोटोंवरून त्याला पदवीच्या दिवसाचा टाइमलॅप व्हिडिओ बनवायचा होता. सर्व फोटो जर तुम्ही पाहीले तर ते अगदी सामान्य आणि भावनाहीन आहेत.

Ghozali Ghozalu
ऊर्जा मंत्र्यांनी केलेलं विधान चुकीचं; भाजपाने जे पेरलं ते उगवतय- पटोले

‘ओपनसी’मध्ये सेल्फी अपलोड करण्याचा निर्णय

डिसेंबर २०२१ मध्ये, घोजालीला ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली आणि तेव्हाच त्याने “घोजाली एवरीडे” या शीर्षकाखाली त्याचा सेल्फी ‘ओपनसी’ वर अपलोड करायचं ठरवलं. त्याने त्याची किंमत प्रति फोटो $3 ​​ठेवली. आपल्या चेहऱ्याच्या फोटोबद्दल कोणाला काय वाटतं, हे पाहण्यासाठी त्यांनी हा केवळ विनोद म्हणून विचार केल्याचे घोजाली सांगतो. एकही सेल्फी विकला जाईल अशी घोजालीला अपेक्षा नव्हती, पण एका सेलिब्रिटी शेफने घोजालीचे काही फोटो विकत घेतले आणि आपल्या सोशल मीडियावर टाकले. बघता बघता घोजालीच्या फ्लॅट सेल्फीची मागणी वाढली.

14 जानेवारी रोजी, घोजालीचा एक सेल्फी 0.247 इथर, म्हणजे सुमारे $806 मध्ये डॉलर मध्ये विकला गेला. इथर एक क्रिप्टोकरन्सी आहे. घोजालीच्या सेल्फींची किंमत कमाल 0.9 इथर झाली आहे. म्हणजेच सुमारे $3,000. घोजालीचा संग्रह एकूण 317 इथर, किंवा 1 दशलक्ष डॉलर्सला विकला गेला आहे. घोजाली आता सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाला आहे आणि त्याच्या NFT सेलवर अपडेट्स देणाऱ्या तिच्या ट्विटला हजारो लाईक्स आणि रिट्विट्स मिळत आहेत. घोजाली यांनी सांगितले आहे की, येत्या काही वर्षात ते सेल्फी विक्री करणं बंद करणार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com