Youth Dies After Taking Enhancement Pills Saam
देश विदेश

गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये नेलं, शरीरसंबध ठेवण्यापूर्वी शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या; क्षणात तरूणाचा मृत्यू

Youth Dies After Taking Enhancement Pills: बॉयफ्रेंडने आधी प्रेयसीला हॉटेलमध्ये नेलं. शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या. तरूणाचा हॉटेलमध्येच मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • तरूणाचा हॉटेलमध्ये मृत्यू

  • प्रेयसीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी गेला होता

  • शक्तिवर्धक गोळ्या घेतल्यानंतर मृत्यू

छत्तीसगडमधील जांजगीर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरूणाची प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवताना दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यानं हॉटेलमध्ये गेल्यानंतर शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या. यानंतर शारीरिक संबंध ठेवताना तरूण खाली कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच मृत्यूचे खरे कारण उघड होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णचंद देवांगन असे मृत तरूणाचे नाव आहे. हा तरूण जावलपूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूण आणि युवतीची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. ही तरूणी बिर्रा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ओळख वाढल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

दोघेही वारंवार एकमेकांना भेटत होते. दोघांनी हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवले. तरूण प्रेयसीला कालिका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी तरूणानं शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या असल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतर शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्यानंतर त्याला त्रास झाला. तो खाली कोसळला.

तरूणाला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तरूणाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून तरूणाला मृत घोषित केले. तरूणाच्या पोटात काही गोळ्याही आढळल्या आहेत. दरम्यान, तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तरूणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

पोलिसांनी सांगितले की, तरूणाने शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितले की, लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या घेतल्यामुळे तरूणाचा मृत्यू झाला. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : कांदा चिरताना तुमचे डोळे पाणावतात ? मग फॉलो करा या सिक्रेट टिप्स

Liver Detox Tips: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी लवंगाचे पाणी ठरेल बेस्ट, तज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स

Narayana Murthy: चीनचा ९-९-६ फॉर्म्युला वापरा, आठवड्यात किती तास काम करावे?नारायण मूर्तींनी पुन्हा दिला सल्ला

दोघेही रंगाने सावळे, मग मुल गोरं कसं झालं? नवऱ्याकडून चारित्र्यावर संशय, बायकोला झोपेतच संपवलं

Mumbai Crime: मुंबईत बिल्डरवर धाडधाड गोळ्या झाडल्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT