मुंबईत इमरान हाश्मींची ठाकरे सेनेत एन्ट्री! शिवसेनेकडून अजित पवार अन् भाजपला जबरदस्त धक्का

Big Political Shake-Up in Mira-Bhayandar: मिरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातील इमरान हाश्मी, आनंद सिंग आणि भाजप नेत्या स्वप्नाली म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय.
Mira Bhayandar Shivsena
Mira Bhayandar ShivsenaSaam
Published On
Summary
  • मिरा भाईंदरमध्ये राजकीय घडामोडींना वेग

  • राष्ट्रवादी अजित पवार गटाला २ बड्या नेत्यांचा जय महाराष्ट्र

  • भाजप महिला नेत्याची शिवसेना ठाकरे गटात एन्ट्री

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका पार पडतील. अशातच स्थानिक पातळीवर नवनवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाआघाडीतील अंतर्गत खदखद समोर येत आहे. कुठे पक्षफोडीतून तर कुठे स्वखुशीने नेत्यांकडून पक्षाला जय महाराष्ट्र करण्यात येत आहे. अशातच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर येथे राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

मिरा भाईंदरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला बळ मिळालं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते इमरान हाश्मी आणि आनंद सिंग यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तसेच, भाजपतील स्वप्नाली म्हात्रे यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. स्वप्नाली म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Mira Bhayandar Shivsena
पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटातील २ नेते आणि भाजप पक्षातील महिला नेत्याने शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे सेनेला मिरा भाईंदरमध्ये नवे बळ मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन्ही नेते पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा होती. या पक्षप्रवेशानंतर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

Mira Bhayandar Shivsena
कुत्रा मागे लागला अन् घाबरून पळाला, तिसऱ्या मजल्यावरून पडला; पुण्यातील इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

मिरा भाईंदर हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बालेकिल्ला मानला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, महापौर, उपमहापौर तसेच सर्वात जास्त नगरसेवक यामुळे पक्ष बळकट होता. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर २ नेत्यांनी पक्षाला रामराम केल्याने अजिच पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तसेच भाजप महिला नेत्याने पक्षाची साथ सोडल्यामुळे मिरा भाईंदरमध्ये भाजपची ताकद कमी झाली असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com