Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : बॉयफ्रेंडचं लग्न झाल्याने गर्लफ्रेंड संतापली अन्...; भर मांडवात नवरा-नवरीवर ॲसिड हल्ला

Acid Attack On Groom And Bride : या धक्कादायक घटनेनं संपूर्ण गाव हादरलं आहे.

Ruchika Jadhav

Chhattisgarh Acid attack : प्रेम प्रकरणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने प्रेयसीने त्याच्यावर थेट ॲसिड हल्ला केला आहे. सदर घटनेनंतर संबंधित प्रेयसीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आसून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण गाव हादरलं आहे. (Crime News)

१० वर्षांपासून सुरू होते प्रेमसंबंध

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी छत्तीसगढ येथे ही भयंकर घटना घडली आहे. आपल्या प्रियकराचे दुसऱ्या मुलीशी लग्न होत असल्याने प्रेयसीला राग अनावर होऊन तिने हे कृत्य केलं आहे. गेल्या १० वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. तरुणीने त्याला अनेक वेळा लग्नासाठी विचारले मात्र त्याने कायम तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. अशात आता तो तिला अंधारात ठेऊन लग्न करत होता.

ॲसिड घेऊन मंडपात धावली

जेव्हा प्रेयसीला आपल्या प्रियकराचा खरा चेहरा समजला तेव्हा तिला मोठा धक्का बसला. या धक्क्याने ती खचून गेली. ज्याच्यावर इतकी वर्षे जिवापाड प्रेम केलं त्यानेच धोका दिला त्यामुळे तरुणीने याचा बदला घेण्याचं ठरवलं. तिने थेट ॲसिडची बाटली घेऊन लग्नमंडपात धाव घेतली आणि प्रियकर तसेच नवरीच्या अंगावर ॲसिड फेकले.

१२ लोक भाजले

तरुणीने जेव्हा प्रियकरावर ॲसिड (Acid) फेकले तेव्हा तिथे उपस्थित इतर व्यक्तींवर देखील हे ॲसिड पडले. या घटनेत एकून १२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना महारानी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रियकराची प्रकृती सध्या गंभीर आहे.

सदर घटनेत २३ एप्रिल रोजी पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतले. त्यानतंर तिच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तरुणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

SCROLL FOR NEXT