लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल भाजपने जिंकली आहे. मध्य प्रदेशमध्ये सत्ता टिकवत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. याशिवाय राजस्थान आणि छत्तीगडमध्येही भाजप बहुमत मिळताना दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेसने केवळ तेलंगणात बहुमताकडे वाटचाल केली आहे.
लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसारखी मोठी राज्ये हातातून गेल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. छत्तीगडमध्ये सत्ता टिकवणे तर दूरच, पण काँग्रेसचे ११ मंत्रीही पराभवाच्या छायेत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. यासाठी ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आलं. आकडेवारीनुसार, छत्तीगडमध्ये १ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
२०१८ विधानसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आली होती. यावेळी देखील काँग्रेस सत्ता राखण्यास यशस्वी ठरेल, असं वातावरण होतं. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून काँग्रेसचे ९० पैकी ५५ जागांवरील उमेदवार आघाडीवर होते.
त्यामुळे काँग्रेसचीच सत्ता येईल, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोषही केला. मात्र, त्यांना आनंद फार काळ टिकला नाही. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या भाजपने नंतर मोठी आघाडी घेतली.
जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली, तस-तसा कल भाजपच्या दिशेने झुकू लागला. परिणामी काही तासांतच मतमोजणीच्या कलांना कलाटणी मिळाली. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठी आघाडी घेतली. भाजपचे सध्या ५५ जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. तर काँग्रेसला फक्त ३३ जागांवर आघाडी मिळाली आहे.
कावर्धामधून विजय शर्मा पुढे, मंत्री मोहम्मद अकबर मागे.
अबिकापूरमधून टी.एस. सिंहदेव पिछाडीवर
सजामधून ईश्वर साहू पुढे, मंत्री रवींद्र चौबे मागे.
पाटणमधून मुख्यमंत्री भूपेश बघेल मागे, विजय बघेल पुढे.
कोंडागावमधून लता उसेंडी मंत्री मोहन मरकाम मागे.
मंत्री ताम्रध्वज साहू पिछाडीवर आहेत.
मंत्री कावसी लखमा देखील पिछाडीवर आहे.
मंत्री अमरजीत भगत मतमोजणीत मागे पडले आहेत.
मंत्री रुद्र गुरु सुद्धा मतमोजणीत मागे आहेत.
मंत्री अनिला भेडिया आघाडीवर होते, मात्र ते देखील पिछाडीवर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.