Chandrayaan-3 Update  Saam TV
देश विदेश

Chandrayaan 3 Update : चांद्रयान 3 चं चंद्रावरील लँडिंग लाइव्ह पाहता येणार, कधी, कुठं आणि कसं?; जाणून घ्या एका क्लिकवर

Chandrayaan 3 News: येत्या २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी खूपच महत्वाचा असणार आहे.

Priya More

Chandrayaan 3 Update : भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रोची महत्वकाक्षी चांद्रयान- 3 मोहीमेबाबत (Mission Chandrayaan 3) सतत महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. भारताच्या चांद्रयान-3 मिशनचे विक्रम लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे.

चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासोबतच लँडर त्याची नवीन छायाचित्रेही घेत आहे. अशामध्ये येत्या २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी खूपच महत्वाचा असणार आहे.

चंद्रावर कधी होणार लँडिंग?

भारताची चांद्रयान 3 मोहिम इतिहास रचण्यापासून अगदी काही पावले दूर आहे. चांद्रयानचे विक्रम लँडर चंद्राला प्रदक्षिणा घालण्यासोबतच त्याची नवीन छायाचित्रे घेत आहे. इस्रोने लँडरने काढलेली अनेक नवीन छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

विक्रम लँडर मॉड्युल येत्या बुधवारी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे. चांद्रयान 3 चं चंद्रावरील लँडिंग भारतीयांना लाईव्ह पाहता येणार आहे. या दिवसाची सर्वच भारतीयांना खूपच उत्सुकता आहे.

लँडिंग लाईव्ह पाहू शकता?

चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंगसाठी पाहण्याासाठी प्रत्येक भारतीय खूपच उत्सुक असून या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत आहे. चांद्रयान ३ चे लँडिंग पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. चांद्रयान ३ चे लँडिंग लाईव्ह पाहण्यासाठी ISRO ने प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध करुन दिला आहे.

- तुम्ही ISRO ची वेबसाइट https://isro.gov.in वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.

- तुम्ही YouTube चॅनेल https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.

- फेसबुक पेज https://facebook.com/ISRO वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.

- DD नॅशनल टीव्ही स्ट्रीमिंगवर देखील तुम्ही लाईव्ह लँडिंग थेट पाहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT