Chandrayaan 3 Update : 3.84 लाख किमी अंतर, 615 कोटींचा खर्च... चांद्रयान 3 मोहिमेतून भारताला काय मिळणार?

Chandrayaan 3 live updates : लँडर मॉड्युल आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे.
Chandrayaan 3 Update
Chandrayaan 3 UpdateSaam TV
Published On

Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान-3 मिशनचे लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. इस्रोने रविवारी दिलेल्या माहितीनुसार लँडर मॉड्यूल चंद्रापासून 25 किमी दूर आहे. लँडर मॉड्युल बुधवारी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे.

रशियाचं यान देखील चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. मात्र रशियाचं लुना 25 यान अतिवेगामुळे चंद्रावर कोसळलं. मात्र एक प्रश्न नेहमी पडतो की 3.84 लाख किमी अंतर कापून आणि 615 कोटींचा खर्च खर्च करून भारताने चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने पाठवलंय. मात्र या मोहिमेतून भारताला काय मिळणार आहे.

Chandrayaan 3 Update
Chandrayaan-3 Update : चंद्रापासून काही मिनिटांच्या अंतरावर पोहोचलं चंद्रयान 3; ISROने शेअर केले चंद्राचे अगदी जवळचे 4 फोटो

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणे लक्ष्य

लँडर मॉड्युल आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचताच, लँडर आणि रोव्हर चंद्रावरील एका दिवसासाठी म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवसांसाठी अॅक्टिव्ह केले जाईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सॉफ्ट लँडिंग करणे हे इस्रोच्या चंद्र मोहिमेचं मुख्य लक्ष्य आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अद्याप कुणीही पोहोचलेलं नाही.

नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास

चांद्रयान ३ मिशनमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक घटक आणि माती, पाण्याचे कण यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेमुळे चंद्राबद्दल जास्तीची माहिती आपल्याकडे उपलब्ध होणार आहे.

Chandrayaan 3 Update
Luna-25 Crash: चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न भंगलं; रशियाचे लूना- 25 चंद्रयान क्रॅश

चांद्रयान 3 ने सोबत अनेक उपकरणे देखील पाठवण्यात आली आहे. चंद्रावरील भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठीचे उपकरणे देखील सोबत आहेत. अशा चाचणीद्वारे शास्त्रज्ञांना चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि तेथील वातावरणातील इतर घटकांची माहिती घेता येणार आहे. (Latest Marathi News)

चांद्रयान-3 मध्ये स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लानेट अर्थ (SHAPE) देखील असेल. जे आपल्या शास्त्रज्ञांना चंद्राभोवती फिरणाऱ्या लहान ग्रहांची माहिती गोळा करण्यासाठी आणि आपल्या सौरमालेबाहेरील जिथे जीवन शक्य आहे, अशा इतर ग्रहांची माहिती एकत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण डेटा कलेक्ट करेल. याशिवाय रोव्हर चंद्रावरील अॅल्युमिनियम, सिलिकॉन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, टायटॅनियम, कॅल्शियम आणि लोहाशी संबंधित माहिती गोळा करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com