Chandrayaan-3 Update : चंद्रापासून काही मिनिटांच्या अंतरावर पोहोचलं चंद्रयान 3; ISROने शेअर केले चंद्राचे अगदी जवळचे 4 फोटो

Isro Share moon Close Photos : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरू शकतो.
Chandrayaan 3 News Update
Chandrayaan 3 News UpdateSaam Tv
Published On

Chandrayaan-3 : चांद्रयान 3 मिशनचे लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 25 X 150 किलोमीटर किंवा 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. चांद्रयान-3 ची दुसरी आणि अंतिम डिबूस्टिंग म्हणजे स्पीड कमी करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

त्यामुळे आता सर्वांचं लक्ष 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सॉफ्ट लँडिंगकडे लागलं आहे.  चांद्रयान 3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यास चंद्रावर पोहोचणारा भारत जगातील चौथा देश बनेल. आजवर अमेरिका, रशिया आणि चीनला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश मिळाले आहे. एवढेच नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरू शकतो.

Chandrayaan 3 News Update
Chandrayaan-3 Update : चांद्रयान- 3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर, आता प्रतीक्षा सॉफ्ट लँडिंगची

चंद्राचे अगदी जवळचे फोटो

चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगसाठी लँडर मॉड्यूल सध्या योग्य जागा शोधत आहे. जागा शोधण्याच्या प्रक्रियेदरम्यान लँडरने आपल्या कॅमेऱ्यातून चंद्राचे अगदी जवळचे फोटो टिपले आहेत. इस्रोने आपल्या ट्विटर हँडलवरुन हे चार फोटो शेअर केले आहेत.

चांद्रयान 3 चंद्रावर कधी उतरणार?

चांद्रयान-3 मोहिमेचे लँडर मॉड्यूल यशस्वीरित्या चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. येत्या बुधवारी म्हणजे 23 ऑगस्टच्या संध्याकाळी 6.45 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे. (Latest Marathi News)

Chandrayaan 3 News Update
Samruddhi Mahamarg: सावधान! समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढाल, तर जेलमध्ये जाल; पोलिसांनी दिले कारवाईचे संकेत

चंद्रावर 14 दिवस संशोधन करणार?

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर रोव्हरचे आयुष्य चंद्राच्या एका दिवसाएवढे म्हणजेच 14 दिवसांपर्यंत आहे. रोव्हर चंद्रावरील अॅल्युमिनियम, सिलिकॉन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, टायटॅनियम, कॅल्शियम आणि लोहाशी संबंधित माहिती गोळा करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com