Anil Deshmukh News: अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, "समझोतासाठी नकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी रेड पडली..."
Maharashtra Political News:
राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या खंडणीप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला आहे. महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी आपल्या पदाचा मोठा गैरवापर केल्याचा आरोप देशमुखांवर करण्यात आला होता. मात्र आता देशमुखांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. समझोतासाठी नकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी रेड पडली, असं त्यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
"आरोप केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी माझ्याशी समझोता करण्याचा प्रयत्न केला. समझोतासाठी त्यांनी दबाव देखील टाकला होता. मात्र माझा यासाठी नकार होता. मी नकार दिल्यामुळे परमवीर सिंग यांना माझ्यावर खोटे आरोप करायला सांगण्यात आले.", असा खुलासा अनिल देशमुखांनी केला आहे.
"भाजपने परमवीर सिंग यांना माझ्यावर कारवाई करायला लावली, हे शंभर टक्के खरं आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव होता, मी सरळ सांगितलं की मी कोणत्याही पद्धतीने समझोता करणार नाही. मी असं सांगितल्यावर दुसऱ्याच दिवशी माझ्यावर रेड पडली.", असे धक्कादायक खुलासे करत देशमुखांनी भाजपवर आरोप केलेत.
राष्ट्रावादीचे सध्या दोन गट तयार झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेत सहभाग घेतला आहे. अजित पवारांनी हे पाऊल उचलण्याआधी पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळेच अजित पवारांसह इतर आमदारांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.
'ईडीची कारवाई बघून काही जण भाजपसोबत'
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील काल एका कार्यक्रमात भाजपवर असाच आरोप केला होता. "गेल्या काळात काही बदल झाले. आपल्या सहकाऱ्यांनी पक्षांतर केलं. ते म्हणतात विकासासाठी गेलो. त्यात काही तथ्य नाही. जे गेले त्यांचावर केंद्र सरकारकडून ईडी चौकशी सुरू आहे. काही चौकशीला सामोरे जायला तयार होते, काही नव्हते. अनिल देशमुख १४ महिने तुरुंगात होते. त्यांना सांगितल होत तुम्ही बदल करा. ते नाही म्हणाले तुरुंगात राहिले.", अशा शब्दांत पवारांनी अजित पवार गटासह भाजपवर हल्लाबोल केला होता. शरद पवारांसह अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांवर भाजप काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.