Ajit Pawar Group mla meet Sharad Pawar : अजित पवार गट आणि शरद पवारांच्या भेटीची 'इनसाइड स्टोरी'; आजच्या भेटीचं खरं कारण आलं समोर

Political News : काल ९ मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटातील आमदारांकडून संताप व्यक्त करण्यात आला
Ajit Pawar, Sharad Pawar , NCP
Ajit Pawar, Sharad Pawar , NCPSaam TV
Published On

Mumbai News : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नव्या मंत्र्यांनी काल  शरद पवार यांची भेट घेतली. कालच्या भेटीची चर्चा सुरु असतानाच आज अजित पवार गटाचे आमदारही शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. या भेटीनंतर पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या भेटींचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मात्र आजच्या भेटीची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त आज राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार मुंबईत हजर होते. या सर्व आमदारांची आज विधीमंडळ कार्यालयात बैठक पार पडली. काल ९ मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटातील आमदारांकडून संताप व्यक्त करण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar , NCP
Maharashtra Political Updates: आशिवार्द घेतले, बाकी काही नाही, नो कमेंट्स; शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली. ९ जणांना मंत्रिपद मिळालं. अन्य आमदारांचे काय? असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. तुम्ही शरद पवारांशी जुळवून घेतले, आम्ही मतदारसंघात काय सांगणार? असा सवाल आमदारांनी विचारला. त्यामुळे आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला जाण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar, Sharad Pawar , NCP
Praful Patel On Sharad Pawar: 'कालप्रमाणे आजही विनंती केली, पण पवारसाहेबांनी...', शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

शरद पवारांची भूमिका

शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या भेटीनंतर त्यांच्या समर्थक आमदारांची भेट घेतली. त्यांच्या समर्थक आमदारांशी बोलताना शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. 'भाजपसोबत जाऊ शकत नाही, उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावं लागेल. शरद पवार यांनी त्यांचे समर्थक आमदार यांच्याशी बोलताना भूमिका केली स्पष्ट केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com