Praful Patel On Sharad Pawar: 'कालप्रमाणे आजही विनंती केली, पण पवारसाहेबांनी...', शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

NCP Meeting Update: सलग दुसऱ्या दिवशी या बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहेत.
Praful Patel On Sharad Pawar
Praful Patel On Sharad PawarSaam TV
Published On

Mumbai NCP Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी केलेल्या आमदारांनी गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. अजित पवार गटाच्या 30 आमदारांनी शरद पवार यांची आज भेट घेतली. तब्बल तासभर या आमदारांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सलग दुसऱ्या दिवशी या बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहेत.

Praful Patel On Sharad Pawar
Mumbai Dam Water Level Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत फक्त ३२ टक्केच पाणीसाठा, कोणत्या धरणात किती साठा?

पवारांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (NCP Leader Praful Patel) यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा अशी विनंती कालही, आजही केली. आमदारांनी आशिर्वाद घेतल्यानंतर पवारसाहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं.', असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

Praful Patel On Sharad Pawar
Sharad Pawar News: 'भाजपसोबत जाऊ शकत नाही'; शरद पवारांनी आमदारांसमोर स्पष्ट केली राजकीय भूमिका

प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, 'अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी रविवारी शरद पवार यांना भेटण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. काल सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून बरेच आमदार उपस्थित झाले. त्यामुळे आज शरद पवारसाहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित आहेत हे समजल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो. प्रत्येक आमदारांनी पवारसाहेबांचे आशिर्वाद घेतले.'

Praful Patel On Sharad Pawar
Uddhav Thackeray Group Election Symbol: ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह जाणार की राहणार? 'या' दिवशी होणार कोर्टात सुनावणी

तसंच, 'कालप्रमाणे आजची भेट पूर्वनियोजित नव्हती. शरद पवार चव्हाण सेंटरला येणार असल्याची माहिती काढली. त्यामुळे आम्ही इथे आलो. कालप्रमाणे आजही आम्ही त्यांना पक्ष एकसंघ राहावा अशी विनंती केली. त्यांनी कालप्रमाणेच आमचं म्हणणं ऐकलं पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे मी आज कसं सांगू शकतो?, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com