Mumbai Dam Water Level Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत फक्त ३२ टक्केच पाणीसाठा, कोणत्या धरणात किती साठा?

dams supplying water to mumbai : यावर्षी धरणातील पाणीसाठा फक्त ३१.२९ टक्के इतकाच पाणीसाठी जमा झाला आहे.
Mumbai Dam Water Level
Mumbai Dam Water LevelSaam Tv News
Published On

Mumbai Dam Water Level: यावर्षी मान्सूनचे (Monsoon 2023) उशीरा आगमन झाले. मान्सून सक्रीय होऊन महिना पूर्ण झाला तरी देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला नाही. परिणामी या धरणांमध्ये कमी पाणी साचले आहे. मागच्या वर्षी धरणातील पाणीसाठा ५९.३३ टक्के इतका होता. यावर्षी धरणातील पाणीसाठा फक्त ३१.२९ टक्के इतकाच पाणीसाठी जमा झाला आहे.

Mumbai Dam Water Level
Navi Mumbai News: शाळेच्या शौचालयात आढळला ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह; नवी मुंबईतील खळबळजनक घटना

मुंबई आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या (Mumbai Rainfall) सरी कोसळत आहेत. अशामध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या हलक्या पावसाने या सातही धरणातील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणाची पाण्याची पातळी एकूण क्षमतेच्या ३२.५३ टक्के ऐवढी झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत धरणातील पातळी ५९.३३ टक्क्यांवर पोहोचली होती. यावर्षीचा धरणातील पाणीसाठा पाहिला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा पाणीसाठी निम्मा आहे.

Mumbai Dam Water Level
Monsoon Session Updates: उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही राष्ट्रवादी कार्यालयातील पाटीवर अजितदादा विरोधी पक्षनेतेच?

मान्सूनचे उशीरा आगमन त्यात चांगला पाऊस पडत नसल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली दिसत नाहीये. यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून दाखल व्हायला विलंब झाला. मागच्यावर्षी मुंबई आणि उपनगरामध्ये 11 जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. पण यावर्षी मान्सूनला दोन आठवडे उशीर झाला. मुंबई आणि उपनगरामध्ये 25 जूनपासून मान्सूनला सुरुवात झाली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला. पण आता पावसाचा जोर कमी झाला आहे. आजपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai Dam Water Level
Saptashringi Fort Landslide: सप्तशृंगी गडावर मोठी दुर्घटना! दरड कोसळून २ भाविक जखमी

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सांगितले की, 'या धरणांमध्ये सध्या जो पाणीसाठा आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त ५० टक्के इतकाच आहे. या महिना अखेरपर्यंत शहरात १० टक्के पाणीकपात सुरू राहणार आहे. या महिना अखेरपर्यंत पाऊस आणि धरणांमधील पाणीसाठा पाहून आम्ही पाणीकपात ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेऊ.' दरम्यान, मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा -

उर्ध्व वैतरणा ९.०७ टक्के

मोडक सागर ५५.०९ टक्के

तानसा ६०.५७ टक्के

मध्य वैतरणा ४५.२० टक्के

भातसा २५.७७ टक्के

विहार ४८.१७ टक्के

तुलसी ६९.२२ टक्के

एकूण ३२.५२ टक्के

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com