Monsoon Session Updates: उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही राष्ट्रवादी कार्यालयातील पाटीवर अजितदादा विरोधी पक्षनेतेच?

Maharashtra Assembly Monsoon Session Latest Updates : अजित दादा गटाकडे जास्त आमदार असूनही त्यांच्याकडून विधीमंडळातील पक्ष कार्यालयावर अद्याप कुठलाही दावा केलेला दिसून आला नाही.
Maharashtra Political News
Maharashtra Political Newssaam tv
Published On

Maharashtra Monsoon Session 2023: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्री देखील बनले. दोन दिवसांपर्वी खातेवाटप देखील झाले. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना खाती मिळाली. अजित पवारांकडे अर्थखात्याची जबाबदारी आली. एवढं सगळ झालेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यलायत आजूनही अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदाचीच पाटी कायम आहे.

एवढंच नाही तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावापुढे देखील पक्षनेते आणि गटनेतेपदाची पाटी आहे, तर विधान परिषदेत मुख्यप्रतोद म्हणून शशिकांत शिंदेच्या नियुक्तची पाटी आहे. (Tajya Marathi Batmya)

Maharashtra Political News
Maharashtra Political Updates: आशिवार्द घेतले, बाकी काही नाही, नो कमेंट्स; शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर अजित दादा गटाकडे जास्त आमदार असूनही त्यांच्याकडून विधीमंडळातील पक्ष कार्यालयावर अद्याप कुठलाही दावा केलेला दिसून आला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. (Latest Political News)

Maharashtra Political News
Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवार विरोधकांच्या बैठकीला जाणार का?, संजय राऊतांनी सांगितलं नेमकं कारण...

राष्ट्रवादीच्या २८ आमदारांची विधानसभेला दांडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एकूण आमदार ५३ आहेत. यातील नवाब मलिक तुरुंगात असल्यामुळे सध्या ५२ आमदार उपलब्ध आहेत. त्यापैकी अजित पवार गटाचे १५ उपस्थित होते, तर शरद पवार गटाचे ९ आमदार सभागृहात उपस्थित होते. राष्ट्रवादीचे एकूण २८ आमदार अनुपस्थित राहिले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com