Champai Soren Resigns: Saam Tv
देश विदेश

Champai Soren Resigns: झारखंडमध्ये मोठी उलथापालथ! चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा CM

Pramod Subhash Jagtap

झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. चंपाई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा त्यांना सुपूर्द केल्यानंतर चंपाई सोरेन म्हणाले की, ''माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. आता हेमंतबाबू परत आले आहेत. आमच्या युतीने पुन्हा निर्णय घेतला आहे. आम्ही आणि आमच्या आघाडीने हेमंत सोरेन यांना पुन्हा नेता म्हणून निवडलं आहे. माझ्याकडे असलेल्या पदाचा मी राजीनामा दिला आहे.''

दरम्यान, आज हेमंत सोरेन आणि चंपाई सोरेन हे दोघेही राज्यपालांना भेटायला आले होते. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर चंपाई सोरेन यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हणजे आहेत. यावेळी हेमंत सोरेन म्हणाले की, 'आम्ही सर्व काम केलं आहे.' आता हेमंत सोरेन हे पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहेत.

मात्र हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदाची शपथ कधी घेणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हेमंत सोरेन 5 तारखेला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. झारखंडमध्ये या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुकाही प्रस्तावित आहेत. याआधी आज चंपाई सोरेन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान, युतीच्या नेत्यांनी आणि आमदारांनी हेमंत सोरेन यांना जेएमएम विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला होता. या बैठकीत हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT