Nitin Gadkari And Electric Scooter
Nitin Gadkari And Electric Scooter Saam Tv
देश विदेश

नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यास केंद्र सरकारकडून बंदी; कंपन्यांना सांगितले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली: संपूर्ण देशभरातून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये (Electric Scooter) आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 3 लोकांचा मृत्य झाला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार (Central Government) या घटनांना घेऊन सतर्क झाली आहे. वृत्त आहे की, सरकार ने इलेक्ट्रिक व्हीकल कंपन्यांचे नवे मॉडेल (Two- Wheeler) लाँच करण्यास प्रतिबंध केला आहे. दरम्यान, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ई-दुचाकी विकण्यास बंधन नाहीत, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाची बैठक;

अलीकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport & Highways) या घटनांबाबत इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांची बैठक घेतली. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बैठकीत मंत्रालयाने आदेशात सांगितले की, त्यांनी त्यांचे नवीन मॉडेल लॉन्च करणे थांबवावे. कारण आतापर्यंत देशभरात सुमारे अनेक इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

सरकार दंडही आकारणार;

तत्पूर्वी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विटच्या माध्यमातून कंपन्यांना सक्त सूचना दिल्या होत्या की, सर्व सदोष वाहने परत बोलावून त्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच या घटनांच्या चौकशीसाठी सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली होती. या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासही समितीला सांगण्यात आले आहे.

समितीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सरकार थकबाकीदार कंपन्यांसाठी सक्तीचे आदेश जारी करेल. लवकरच, इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे (quality-focused guiding principles) जारी केली जातील आणि कोणत्याही कंपनीने गुणवत्तेच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास, त्याच्यावर मोठा दंड आकारला जाईल.

ओला इलेक्ट्रिक आणि ओकिनावा ऑटोटेकने परत मागवले स्कुटर्स;

ओला इलेक्ट्रिक (Ola Electric Scooter) आणि ओकिनावा ऑटोटेक या दोन प्रमुख इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्या कंपन्यांनी आगीच्या घटनांनंतर त्यांचे इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवले आहेत. यामध्ये ओलाने 1441 आणि ओकिनावाने 3215 स्कूटर रिकॉल केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT