विदर्भात पारा भडकणार! 'या' चार जिल्ह्यात आजपासून ऑरेंज अलर्ट

यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच पारा आपले सर्व रेकॉर्डस् तोडत आहेत. राज्यातील शहरांमध्ये उष्णतेच्या झळांनी नागरिक पुरते हैराण झाले आहे.
Heat Wave
Heat WaveSaam Tv
Published On

अमर घटारे

अमरावती: यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच पारा आपले सर्व रेकॉर्डस् तोडत आहेत. राज्यातील शहरांमध्ये उष्णतेच्या झळांनी नागरिक पुरते हैराण झाले आहे. विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये आजपासून तापमान असेच वाढत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या 4 जिल्ह्यांमध्ये आजपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात सुद्धा वातावरणात बदल झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील उष्णतेचा पारा सध्या 44 अंशाच्या पुढे सरकला आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार उन्हाचा पारा असाच भडकत राहील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Heat Wave
दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान; 9 लोकांचा मृत्यू, 13 जखमी

दरम्यान, सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात कडक ऊन आहे. या भीषण घटनेने सर्वजण त्रस्त दिसत आहेत. राजधानी दिल्लीत (Delhi Weather Update) अशी परिस्थिती आहे, गेल्या 52 वर्षात दुसऱ्यांदा एप्रिल महिन्यात एवढ्या उष्णतेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. गुरुवारी हवामान केंद्रात कमाल तापमान 43.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त आहे. यापूर्वी 18 एप्रिल 2010 रोजी 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. काल गुरुवारी सकाळपासूनच दिल्लीच्या बहुतांश भागात तीव्र उष्णता होती. जसजसा दिवस पुढे सरकत होता, तसतसा तापमानही अधिक तापत होते. हवामान खात्यावर, यंदाचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे.

हे देखील पाहा-

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कमाल तापमान 40 अंशांच्या वर आणि सामान्यपेक्षा साडेचार अंशांनी जास्त असेल तेव्हा ही उष्णतेच्या लाट स्थिती मानली जाते. तर, जेव्हा कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त आणि सामान्यपेक्षा साडेसहा अंश जास्त असते तेव्हा ती तीव्र उष्णतेची लाट मानली जाते. त्यानुसार दिल्लीतील अनेक भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com