Cbsc boards exams Saam Tv
देश विदेश

CBSE Exam 2025 : परीक्षेत मोबाईल वापरल्यास २ वर्षांची बंदी, अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई होणार; बोर्डाने नियमात काय बदल केले?

CBSE Exam News : येत्या काही दिवसांमध्ये सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. परीक्षांच्या दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी बोर्डाने नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

Yash Shirke

CBSE Exam 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीसारख्या अनुचित गोष्टी होऊन नये यासाठी कठोर नियम लागू केले आहेत. परीक्षा सुरु असताना मोबाईल फोन अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. जर एखादा विद्यार्थ्यांने या नियमाचे पालन केले नाही, तर त्याला दोन वर्ष परीक्षेला बसता येणार नाही. पूर्वी ही शिक्षा एक वर्षापुरती मर्यादित होती.

परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी या संदर्भात माहिती दिली. परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आधी एका वर्षाचा बॅन लावला जात असे. पण आता कॉपी केल्यावर विद्यार्थाला दोन वर्ष परीक्षा देता येणार नाही. या व्यतिरिक्त परीक्षेसंबंधित सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. मागच्या वर्षी परीक्षेबद्दल अनेक अफवा पसवरल्या गेल्या होत्या.

परीक्षेमध्ये पारदर्शिकता राहावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कोणतेही इलेक्ट्रीक उपकरण आहे का याचीही केंद्रात तपासणी केली जाणार आहे. परीक्षा सुरु असताना कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जाव्यात यासाठीची तयारी बोर्डाने सुरु केली आहे. यासाठी बोर्डाने काही नियमांमध्ये बदल केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश बोर्डाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: श्री क्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

SCROLL FOR NEXT