Nashik News : भुजबळांना मानाचे स्थान, गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले; भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांचं मोठ वक्तव्य

Amit Shah Chhagan Bhujbal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला छगन भुजबळ देखील सामील झाले आहेत. दौऱ्यातील एका कार्यक्रमामध्ये हे दोघे एकाच मंचावर आले. त्यांच्यामध्ये संवाददेखील झाला.
Amit Shah Chhagan Bhujbal
Amit Shah Chhagan BhujbalSaam Tv
Published On

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिक दौऱ्यावर आहे. त्यांनी नाशिकला पोहोचल्यावर त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर ते मालेगावच्या अजंग गावात एका कार्यक्रमासाठी पोहोचले. छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्या दौऱ्यावर त्यांच्यासोबत आहेत. मालेगावच्या कार्यक्रमालाही दोघांनी उपस्थिती लावली आहे.

अजंग गावात सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अमित शाह यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ बसले आहेत. अमित शाह यांनी स्वत: छगन भुजबळांना जवळ बोलवून शेजारच्या खूर्चीवर बसवले. व्यासपीठावर अमित शाह आणि छगन भुजबळ एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले. तेव्हा भुजबळांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांना उधाण आले.

अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीला भुजबळांचे कौतुक केले. छगन भुजबळ हे एनडीएचे महत्त्वाचे नेते आहे असे म्हणत शाह यांनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, 'लाल बहादुर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. तर नरेंद्र मोदी यांनी जय विज्ञानचा नारा दिला आहे. शिवाजीरावांना हा नारा प्रत्यक्षात आणला आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतीला निश्चित फायदा होईल. अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. पाण्याची पीएच प्रमाण किती आहे याचाही अभ्यास सुरु आहे. लवकरच ऑरगॅनिक शेतीची सुरुवात होईल.'

अमित शाह पुढे म्हणाले, 'ऑरगॅनिक लॅबोरेटरी सुरू करा, भारत सरकार तुम्हाला मदत करेल असे मी शिवाजीराव यांना सांगितले आहे. सहकार मंत्रालयाने ऑरगॅनिक को ऑपरेटिव्ह लिमिटेड तयार केले आहे. त्यासाठी लागणारे सर्टिफिकेट ही संस्था तयार केली आहे. या संस्थेत १ लाखांहून अधिक सदस्य आहेत. जवान आणि किसान यांना एकत्र आणण्याचे काम या संस्थेने केले आहे.'

Amit Shah Chhagan Bhujbal
Syndrome Disease: मेंदूच्या आजारानं वाढवलं पुणेकरांचं टेन्शन; चार रुग्णांची प्रकृती गंभीर

मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज होते. त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. भुजबळ अजित दादांची साथ सोडून पुढे भाजपाचा रस्ता निवडणार अशा चर्चा सुरु होत्या.

Amit Shah Chhagan Bhujbal
Walmik Karad : वाल्मिक कराडला सिटी स्कॅनचा सल्ला, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण... | VIDEO

अशात छगन भुजबळ यांनी आज (२४ जानेवारी) मालेगावात गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मालेगावच्या कार्यक्रमात व्यासपिठावर दोघे एकमेकांच्या बाजूला बसले आहेत. सर्वांसमोर त्यांच्यामध्ये संवाददेखील झाला. आता नाराज भुजबळ पुढे कोणता निर्णय घेणार या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Amit Shah Chhagan Bhujbal
Beed News : बीडच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा, आवरगावच्या सरपंचाला मिळाले प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com