Beed News : बीडच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा, आवरगावच्या सरपंचाला मिळाले प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण

Republic Day News : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत प्रजासत्ताक दिनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात येते. या वर्षी बीड जिल्हातील सरपंच अमोल जगताप यांना दिल्लीला बोलवण्यात आले आहे.
Republic day
Republic daySaam Tv
Published On

रोहिदास गाडगे, साम टीव्ही, प्रतिनिधी

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या कर्तव्यपथावर भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी बीडमधील आवरगाव गावाचे सरपंच अमोल जगताप यांना बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. गावकऱ्यांसह गावाची प्रगती केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत दरवर्षी प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झेंडावंदन सोहळा आणि विशेष परेडसाठी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण दिले जाते. या वर्षी बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील आवरगावचे सरपंच अमोल सर्जेराव जगताप यांना दिल्लीचे निमंत्रण मिळाले आहे.

आवरगाव ग्रामपंचायतीला आतापर्यंत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यस्तरीय पुरस्कार, आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार, आबासाहेब खाडेकर स्वच्छालय व्यवस्थापन राज्यस्तरीय पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सरपंच अमोल जगताप यांच्या कारकीर्दीत गावात विकास झाला आहे.

Republic day
Pune News : परदेशात गाड्या चालवण्यातही पुणेकर अव्वल, १४ हजार ७७४ पुणेकरांनी काढले इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स

गावाचा सर्वांगीण विकास केल्याबद्दल भारत सरकारने दिल्लीतल्या कर्तव्यपथावर बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सरपंच जगताप यांना दिली आहे. गावाला समृद्ध करणाऱ्या जगताप यांना आदर्श सरपंच म्हणून संबोधले आहे. ही संधी दिल्याबद्दल जगताप यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

Republic day
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; लातूर, धाराशिवमध्ये आंदोलन, सोलापुरातही शेतकरी आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com