Lalu Prasad Yadav News Saam TV
देश विदेश

Lalu Prasad Yadav : सीबीआयने लालू यादव यांना पाठवले समन्स, उद्या होणार चौकशी

सीबीआयने लालू यादव यांना समन्स बजावले आहे.

Shivani Tichkule

Lalu Prasad Yadav News : नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी सीबीआयने लालू यादव यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात कथित सहभागाबाबत सीबीआय उद्या दिल्लीत लालू यादव यांची चौकशी करणार आहे.

सोमवारी सकाळी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी केली. सीबीआयने राबडी देवी यांची तब्बल 4 तास चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी देण्याच्या प्रकरणी सीबीआयने राबडी देवी यांची चौकशी केली.

सीबीआय चौकशी संपल्यानंतर राबडी देवी विधान परिषदेत जात असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर राबडी देवी संतापल्या, त्या म्हणाल्या सीबीआय (CBI) आली तर काय करणार? सीबीआय नेहमीच आमच्या ठिकाणी येत असते.

न्यायालयाने यापूर्वीच लालू, राबरी यांच्यासह १४ जणांना समन्स पाठवले होते. विशेष म्हणजे या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने लालू यादव (Lalu Yadav) राबडी देवी, मिसा भारती यांच्यासह १४ आरोपींना समन्स बजावले असून त्यांना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. लालू नुकतेच किडनी प्रत्यारोपण करून सिंगापूरहून मायदेशी परतले असताना त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

वास्तविक नोकरी घोटाळ्याचे हे प्रकरण १४ वर्षे जुने आहे. हा घोटाळा लालू यादव रेल्वेमंत्री असतानाचा आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना लोकांना रेल्वेत नोकऱ्या देण्याऐवजी जमिनी लिहून घेतल्याचा दावा केला जात आहे. लालू यादव 2004 ते 2009 पर्यंत रेल्वे मंत्री होते.

याप्रकरणी सीबीआयने १८ मे रोजी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, 2004 ते 2009 दरम्यान रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यांनी अनेकांना ग्रुप डीच्या नोकऱ्या दिल्या आणि त्याबदल्यात जमिनी लिहून घेतल्याचा आरोप आहे.

या नोकऱ्या मुंबई (Mumbai) जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर झोनमध्ये देण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poor Sleep: तुमच्या 'या' वाईट सवयीमुळे झोप येण्यास येतो अडथळा, आजच टाळा

Last Stop Khanda Marathi Movie: प्रत्येकाला थिरकायला लावणारं "लास्ट स्टॉप खांदा" चित्रपटाचं टायटल साँग रिलीज, चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra Live News Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन

Rohit Arya Encounter: पवई ओलीसनाट्यातील आरोपीच्या छातीत गोळ्या, पोलिसांनी केला रोहित आर्याचा एन्काऊंटर|VIDEO

Powai Hostage Case: वेबसीरीजसाठी ऑडिशन, हॉल रेंटवर घेतला; मुलांना डांबण्याचा प्लान, मुंबईतील ओलीसनाट्याचा थरार वाचा!

SCROLL FOR NEXT