Crime News : पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले 6 तुकडे; 2 महिन्यांनी असा झाला उलगडा

Raipur Crime News : या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
Crime News
Crime NewsTwitter/@ANI

Chhattisgarh Crime News : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर अशा प्रकारची अनेक प्रकरणं आता समोर येत आहे. आता अशीच हृदय पिळवटून टाकणारी आणखी एक घटना छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेत पतीने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे ६ तुकडे केले. एवढेच नाही तर आरोपीने महिलेच्या मृतदेहाचे तुकडे स्वतःच्याच घरातील पाण्याच्या टाकीत फेकल्याची घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

Crime News
Cotton Price : शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव; 2 महिन्यात 136 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य

दोन महिन्यांपूर्वी आरोपीने पत्नीची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पत्नीचे कोणाशी तरी अवैध संबंध असल्याचा पतीला संशय होता, त्यामुळे त्याने पत्नीची हत्या केली.

खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत:ला वाचवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले आणि पाण्याच्या टाकीत फेकले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोध घेतला असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी (Police) आरोपी पतीला अटक केली आहे.

चौकशीत आरोपी पतीने सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीवर संशय होता. बायकोचं कुणाशी तरी अवैध संबं असल्याचं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याने पत्नीची हत्या केली. याप्रकरणी सध्या पोलीस आरोपी पवन ठाकूरची चौकशी करत आहेत. (Crime News)

असा झाला हत्येचा उलगडा

माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला बनावट नोटांसह अटक केली होती. याप्रकरणी पोलीस आरोपीच्या घरी शोध घेण्यासाठी पोहोचले होते. यानंतर येथील दृश्य पाहून पोलीस चकित झाले. आरोपीच्या घरातून पोलिसांना विचित्र वास येत होता. घराची झडती घेतली असताना त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांना पाण्याच्या टाकीत मृतदेहाचे ६ तुकडे सापडले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून बनावट नोटांचे बंडल आणि नोट मोजण्याची मशीनही जप्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com