Cotton Price : शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव; 2 महिन्यात 136 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य

Marathwada Farmer : मराठवाड्यात गेल्या २ महिन्यांत तब्बल १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या.
Cotton Price
Cotton Price Saam Tv

Cotton Price News : सध्या कापूस शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय. बळीराजाची कापूसकोंडी झाल्यानं मराठवाड्यामध्ये 2 महिन्यात 136 शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्यात. जर ही कापूस कोंडी लवकर सुटली नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत जाईल. (Latest Marathi News)

Cotton Price
Crime News: धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने महिलेने केली स्वतःच्याच घरात चोरी; 'अशी' अडकली पोलिसांच्या जाळ्यात

कृषिमंत्र्याच्या मतदारसंघात गेल्या चोवीस तासात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. इतकंच नाही तर गेल्या दोन महिन्यात मराठवाड्यात (Marathwada) तब्बल 136 शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केलंय. खरिपात अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांनी (farmer) आत्महत्या केल्या. त्यातून काही शेतकरी कसेबसे उभे ठाकले. तर आता कापसाच्या भावानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात नेऊन सोडलं आहे.

कापूस हे नगदी पीक असल्याने चार पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडतील अशी अपेक्षा होती. पण कापूस वेचून घरी आणताच बाजारात भाव पडला आणि कापसामुळे शेतकरी मरणाच्या दारात अडकून पडलाय. मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी या जिल्ह्यात 3 महिन्यांपासून हजारो शेतकऱ्यांच्या घरात लाखो क्विंटल कापूस विक्री विना पडला आहे. कापसाच्या भरवशावर जे आर्थिक नियोजन केले होते ते सगळे कोलमडून पडले. पुन्हा पैशासाठी बँका, खाजगी सावकाराच्या दारात शेतकऱ्यांना जाण्याची वेळ आली आहे.

Cotton Price
ATM Crime: एटीएममधून पैसे काढताना वापरायचा नामी शक्‍कल; खात्यातून डेबिट न होता निघायची रक्‍कम

राज्यात ४२ लाख हेक्टरवर पीक घेणाऱ्या ६० ते ७० लाख शेतकऱ्यांच्या घरांत कमीअधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. या कापूस कोंडीमुळे शेतकरी आयुष्यच संपवत आहेत. एकट्या मराठवाड्यात गेल्या २ महिन्यांत तब्बल १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. छत्रपती संभाजीनगरात जिल्ह्यात १३, जालना ११, परभणी १२, हिंगोली २, नांदेड १७, बीड ४७, लातूर ९, उस्मानाबाद २५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला तरी शेतकऱ्यांच्या समस्या आणि कापूस प्रश्नावर फारशी चर्चा झालेली नाही. सरकारने कापसावर अजूनही काहीही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढत चालल्याने आत्महत्या ही रोखणं आता कठीण झालंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com