Russia Developed Cancer Vaccine Saam Tv
देश विदेश

Cancer Vaccine: कॅन्सरवर आली लस, रशियाचा दावा; नागरिकांना कधीपासून मिळणार फ्री?

Russia Developed Cancer Vaccine: कॅन्सरवर लस तयार करण्यात रशियाला यश आले आहे. रशियाने नुकताच मोठी घोषणा केली. रशियाने कॅन्सरवर लस तयार केली असून नागरिकांना ही लस मोफत दिली जाणार आहे.

Priya More

कॅन्सर आजाराने सध्या संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवले आहे. हा आजार झाल्याचे कळताच आपल्या पायाखालची जमीन हादरते. कॅन्सरमुळे जगभरात लाखो नागरिकांचा मृत्यू होत आहे. या कॅन्सरवर लस काढण्याचे जगभरातील वेगवेगळ्या देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. अशामध्ये कॅन्सरवर लस तयार करण्यात रशियाला यश आले आहे. रशियाने नुकताच मोठी घोषणा केली. कॅन्सरची लस तयार केली असून नागरिकांना ती मोफत दिली जाणार असल्याचे रशियाने सांगितले.

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने नुकताच दावा केला की, त्यांनी कर्करोगाची लस तयार केली आहे. ही लस ते रशियामधील नागरिकांना मोफत देणार आहेत. रशियाच्या सरकारी मीडियाच्या वृत्तानुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे काप्रिन यांनी सांगितले की, या लसीचा शॉट २०२५ च्या सुरुवातीला लाँच केला जाईल. रशियातील कॅन्सरच्या रुग्णांना ही लस मोफत दिली जाणार आहे. रशियाने कॅन्सरवर mRNA वॅक्सिन विकसित केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने तयार केलेली ही लस कॅन्सरच्या रुग्णांना दिली जाणार आहे. ही लस दिल्यानंतर कॅन्सरच्या ट्यूमरची निर्मिती रोखण्यास मदत होणार आहे. रशियन शास्त्रज्ञांच्या मते या लसीचा प्रत्येक शॉट वैयक्तिक रुग्णासाठी तयार केला जाईल. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच सांगितले होते की, 'त्यांच्या देशातील शास्त्रज्ञ कॅन्सरच्या लसीवर काम करत असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.'

महत्वाचे म्हणजे, रशियाने तयार केलेली ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर असणार आहे. ती कॅन्सरवर किती प्रवाभी असेल आणि त्याची अंमलबजावणी रशिया कशी करणार याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही. रशियामध्ये कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रशियाने तयार केलेली ही लस जर प्रभावी ठरली तर कॅन्सर रुग्णांची संख्या रोखण्यास मदत होईल.

जगभरामध्ये जीवघेणा आजार असलेल्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगातील इतर देशांप्रमाणे रशियामध्येही कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. रशियामध्ये २०२२ मध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ६,३५,००० पेक्षा जास्त नोंदवली गेली होती. रशियामध्ये कोलन, स्तन आणि फुफ्फुसाचा कॅन्सरचे रुग्ण जास्त आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT